वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा चांगलाच धुव्वा उडवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनल सामन्यात भारताचा मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. आज एम्बेस्टनमध्ये दोन्ही संघ एकमेकांच्याविरोधात लढणार आहेत. दोन्ही पारंपारिक संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार असल्याने या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सामन्यात कर्णधार युवराज सिंगच्या रणनीती आणि खेळीकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्स हा केवळ एक क्रिकेटचा सामना नाही तर कौशल्य, ध्यास आणि इतिहासाची एक मोठी स्पर्धा आहे. भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक स्पर्धक आहेत. दोन्ही संघांदरम्यान अनेक अविस्मरणीय सामने झालेले आहेत. दोन्हीही संघ जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा जिंकण्याच्या इर्षेनेच उतरतात. दोन्ही प्रतिस्पर्धी संघाचा सामना पाहताना क्रिकेटप्रेमीही रोमांचित होत असतात. 2007च्या टी20 विश्वचषकात नर्व्ह-ब्रेकिंग सामन्यापासून ते 2011 आणि 2019च्या एक दिवसीय नाट्यमय खेळापर्यंत या दोन्ही संघाने अविस्मरणीय क्षण क्रिकेटप्रेमींच्या वाट्याला दिले आहेत.
युवराज सिंग, सुरैश रैना आणि पठाण आदी दिग्गजांची भारतीय टीम अनुभव आणि आक्रमकतेचं मिश्रण घेऊन येते. तर रॉबिन उथप्पाची लाइन अप हाय ऑक्टेन क्रिकेटचं दर्शन घडवते. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघात यूनूस खान, शाहीद आफ्रिदी आणि शोएब मलिक सारखे दिग्गज आहेत. या तिन्ही दिग्गजांमध्ये मॅच जिंकून देण्याची पूर्ण क्षमता आहे. त्यामुळेच आजची टफ फाईट सर्वांचीच उत्कंठा वाढवणारी आहे.
WCLच्या फायनलद्वारे युवराज सिंगला पाकिस्तानकडून हिशोब चुकता करण्याची संधी आहे. त्यामुळेही या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या संपूर्ण सामन्यात क्रिकेटप्रेमींना रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे पआयनलमध्येही तेवढाच रोमांचक सामना पाहायला मिळेल अशी आशा आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता ही मॅच सुरू होणरा आहे. स्टार स्पोर्ट्सवरून या सामन्याचं थेट प्रेक्षेपण केलं जाणार आहे. डिजिटल स्ट्रीमिंग फॅनकोडवर उपलब्ध होणार आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशी ऑफ लीजेंड्समध्ये पहिल्या सेमीफायनलमध्ये यूनिस खानच्या नेतृत्वात पाक्सितान संघाने वेस्ट इंडिजला 20 धावांनी पराभूत केलं होतं. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून पाकिस्तानला आधी फलंदाजी करायला बोलावलं होतं. पाकिस्ताने फलंदाजी करताना 10 धावांवरच तीन विकेट गमावले होते. त्यानंतर कामरान अकमल आणि यूनिस खान यांनी डाव सांभाळला. कामरानने 31 चेंडूत 46 धावा केल्या तर यूनिसने 45 चेंडूत 65 धावा केल्या होत्या. त्यानंतर आमिर यामिन याने 18 चेंडूत 40 धावांची धुवांधार खेळी केली होती. सोहेल तनवीरनेही 17 चेंडूत 33 धावा कुटल्या होत्या. पाकिस्तानने 198 धावा कुटल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संपूर्ण डाव 178 धावांमध्ये आटोपला होता.