मुंबई: पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाने काल ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी दिली. दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला प्राधान्य दिलं. पण ऋषभने पुन्हा एकदा टीमला निराश केलं. रोहित शर्माने ऋषभ पंतवर विश्वास टाकला. पण पंतला तो विश्वास सार्थ ठरवता आला नाही. फक्त 12 चेंडूत 14 धावा करुन तो आऊट झाला.
यश आणि अपयश खेळाचा भाग आहे. पण पंत ज्या पद्धतीने आऊट झाला, ते पाहून रोहित स्वत:वर नियंत्रण ठेवू शकला नाही. तो ड्रेसिंग रुम मध्येच भडकला. पंतने फिरकी गोलंदाज शादाब खानच्या चेंडूवर रिव्हर्स स्विप मारण्याचा प्रयत्न केला. पण तो फटका फसला. त्याने आसिफ अलीकडे सोपा झेल दिला. त्यावेळी खरंतर टीम इंडियासाठी मोठ्या फलंदाजाने क्रीजवर उभं राहण्याची आवश्यकता होती. पंत आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यावेळी रोहित शर्मा त्याच्यावर चिडल्याचं दिसलं.
पंतने अशा पद्धतीने आपला विकेट गमावण्याची ही पहिली वेळ नाहीय. पंत अनेकदा अशा पद्धतीने आऊट झालाय. नेहमीच रोहित शर्माने त्याला पाठिशी घातलय. पण यावेळी रोहितला नियंत्रण ठेवता आलं नाही. फोटोंमधून तो चिडल्याच दिसलं. पंतने सेट झाल्यानंतर अनेकदा खराब फटके खेळून बाद होतो. तो संघाला नेहमीच महाग पडतं.
टीम इंडियाकडून विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावलं. त्या बळावर भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 182 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. रोहित शर्मा आणि केएल राहुल दोघांनी प्रत्येकी 28 धावा केल्या.
ऋषभ पंतचा टी 20 मध्ये रेकॉर्ड निराशाजनक आहे. त्याचा स्ट्राइक रेट 125 पेक्षाही कमी आहे. त्याशिवाय फलंदाजीची सरासरी सुद्धा 25 पेक्षा कमी आहे. पंत भले मॅचविनर समजला जातो, पण टी 20 क्रिकेट मध्ये त्याच्या कामगिरीबद्दल अनेक प्रश्न आहेत.