T20 World Cup 2021 : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी 20 विश्वचषक सामन्याचा हायव्होल्टेज सामना सुरु आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानची वेगवान गोलंदाजीसाठी ओळख आहे. तीच ओळख याच सामन्यात ठळकपणे नमूद होताना दिसली. कारण भारताचे मातब्बर सलामीवीर स्वस्तात तंबूत परतले. पाकिस्तानचा खतरनाक गोलंदाज शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकात सलामीवर रोहित शर्माचा बळी घेतला. तर तिसऱ्या षटकात त्याने सलामीर के एल राहुलचा त्रिफळा उडवला. एकीकडे भारताच्या एकामागेएक अशा विकेट पडत होत्या. पण दुसरीकडे कर्णधार विराट कोहली एकेरी कमान सांभाळताना दिसला. त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांच्या माऱ्याला सडेतोड प्रत्युत्तर देत अर्धशतक साजरी केलं. या दरम्यान सूर्यकुमार यादव 8 चेंडूत 11 धावा करुन बाद झाला. तर भारताचा तरुण तडफदार ऋषभ पंतने देखील सुपरफास्ट फलंदाजी केली.
विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्यातील भागीदारी ही या सामन्यात केंद्रबिंदू ठरताना दिसली. कारण एकीकडे विराट खमकेपणाने डाव सावरत होता. तर दुसरीकडे ऋषभ पंत पाकिस्तानच्या गोलंगाजांना धुळ चारत होता. पण पाकिस्तानचा गोलंदाज शादाब खानने ही जोडी फोडली. त्याने ऋषभला झेलबाद केलं. ऋषभ पंतने 30 चेंडूत 39 धावा केल्या. यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकाचा समावेश होता. विराट आणि ऋषभ यांनी मोठी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. त्याने डाव सावरण्याचा पूर्णप्रयत्न केला. विशेष म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तानच्या या दबावाच्या सामन्यात ऋषभ पंत 130 च्या स्ट्राईक रेटने खेळत होता.
भारताचा पहिला गडी पहिल्याच षटकात तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली मैदानावर फलंदाजीसाठी आला. तो मैदानावर स्थिर होत नाही तोच दुसरा सलामीवीर के एल राहुल याचा त्रिफळा उडाला. त्यामुळे भारतीय संघावरील दबाव वाढला. भारत-पाकिस्तान यांच्यातील शत्रूत्व जगाला माहिती आहे. तो दबाव दोन्ही संघावर आहे. पण प्रथम फलंदाजी करताना पहिल्या तीन षटकांत दोन गडी तंबूत परतले. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर मोठा दबाव होता. पण या दबावाला बळी न ठरता विराट मैदानावर मोठ्या आत्मविश्वासाने तग धरुन खेळला. त्याचा हा आत्मविश्वास स्पष्टपणे जाणवताना दिसला.
विराटने सामन्यात अर्धशतक झळकावत टी20 विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकं लगावण्याचा रेकॉर्ड केला आहे. याआधी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 9 अर्धशतकं लगावली होती. विराटनेही 9 अर्धशतकं लगावली असून आजच्या अर्धशतकासह त्याची टी20 विश्वचषकात 10 अर्धशतकं झाली आहेत.
भारतीय संघाची आजची सुरुवातच खराब झाली. भारताचा मातब्बर खेळाडू सलामीवीर रोहित शर्मा आज पहिल्याच षटकात शुन्यावर बाद झाला. त्यापाठोपाठ के एल राहुल हा क्लिन बोल्ड झाला. दोघांना पाकिस्तानचा गोलंदाज शाहिन आफ्रिदी याने आऊट केलं. त्यानंतर मैदानावर कर्णधार विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे सूर्यकुमार चांगल्याच जोशमध्ये आला होता. त्याने एक चोकार आणि षटकार लगावला. पण सूर्यकुमार अखेर हसन अलीच्या बोलवर झेलबाद झाला. रिझवानने त्याचा झेल टिपला आणि भारताचा तिसरा गडी तंबूत परतला. सूर्यकुमारने 8 चेडूत 11 धावा केल्या. त्यानंतर भारताचा तरुण तडफदार खेळाडू ऋषभ पंत विराटला साथ देण्यासाठी मैदानावर दाखल झाला. त्याने विराटला साथ देत पाकिस्तानच्या गोलंदाजांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. त्याने 30 चेंडूत 39 धावा केल्या. यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकाचा समावेश आहे. त्यानंतर मैदानावर आलेला रविंद्र जडेजा 12 चेंडूत 13 धावा केल्या. यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे.
हेही वाचा :