IND vs PAK : ‘T20 वर्ल्ड कप काळी जादू…’, महामुकाबल्याआधीच पाकिस्तानच्या दिग्ग्जाला टेन्शन

| Updated on: May 16, 2024 | 3:13 PM

IND vs PAK T20 World Cup : वर्ल्ड कपमध्ये जेव्हा-जेव्हा भारत-पाकिस्तान आमने-सामने आले आहेत, त्या-त्या वेळी भारताने पाकिस्तानला हरवलय. T20 वर्ल्ड कपमध्ये 7 वेळा दोन्ही टीम आमने-सामने आल्या. त्यात फक्त एकदा पाकिस्तानला विजय मिळाला. टीम इंडियाने प्रत्येकवेळी बाजी मारली. आता 9 जूनच्या मॅचआधी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंना पराभवाची भीती सतावतेय.

IND vs PAK : T20 वर्ल्ड कप काळी जादू..., महामुकाबल्याआधीच पाकिस्तानच्या दिग्ग्जाला टेन्शन
IND vs PAK T20 World Cup
Image Credit source: ICC/ICC via Getty Images
Follow us on

IPL 2024 चा 17 वा सीजन अजून संपलेला नाही. प्लेऑफमध्ये कुठल्या चार टीम दाखल होणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या दरम्यान सगळ्यांना प्रतिक्षा आहे 9 जूनची. न्यूयॉर्कच्या नॅसो काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर भारत-पाकिस्तान T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आमने-सामने येणार आहेत. दोन्ही टीममधील हा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते उत्सुक्त आहे. रेकॉर्ड लक्षात घेता पुन्हा एकदा टीम इंडिया जिंकेल अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानला आतापासूनच या मॅचच टेन्शन आलं आहे. पाकिस्तानचा एक माजी कर्णधार काळ्या जादू पर्यंत बोलून गेलाय.

भारत-पाकिस्तानच्या टीम T20 वर्ल्ड कपमध्ये जेव्हा-जेव्हा आमने-सामने आल्या, त्या-त्या वेळी पाकिस्तानच्या पदरी निराशा आलीय. वनडे वर्ल्ड कपमध्ये ते प्रत्येकवेळी हरले आहेत. T20 वर्ल्ड कपमध्ये 7 पैकी फक्त एकदा त्यांना विजयाचा स्वाद चाखता आलाय. मागच्या T20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या एका शानदार इनिंगने पाकिस्तानचा विजयाचा घास हिरावला होता. आजही पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनात या आठवणी ताज्या असतील.

टीममध्ये मेंटल ब्लॉक

वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची काही दिवस आधीपासूनच चर्चा सुरु होते. पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह उल हक भारतीय टीमचा दबदबा आणि पाकिस्तान टीमवरच्या दबावाबद्दल बोलता. स्टार स्पोर्ट्सचा शो ‘प्रेस रूम’ मध्ये मिस्बाहने एक गोष्ट मान्य केली. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया विरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानी टीममध्ये मेंटल ब्लॉक दिसतो. टीम इंडियाला नमवण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल हे मिस्बाहने मान्य केलं.

तिथे भारताने पाकिस्तानला हरवलं

तो म्हणाला की, ओव्हरऑल क्रिकेट रेकॉर्डमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानची बाजू वरचढ आहे. पण वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच पारडं जड असतं. त्याने 2007 सालच्या T20 वर्ल्ड कपचा उल्लेख केला. पाकिस्तानचा तिथे दोनवेळा विजयाची संधी मिळूनही पराभव झाला. वर्ल्ड कपमध्ये मिस्बाहला पराभवाची मालिका खंडीत करायची होती. टीमला विजयासाठी 14 चेंडूत 49 धावांची गरज होती. टीमला तो विजयाच्या जवळ घेऊन गेला होता. पाकिस्तानला विजयासाठी 2 चेंडूत 1 रन्सची आवश्यकता होती. पण ही धाव निघाली नाही, मॅच टाय झाली. त्यानंतर सामना बॉल आऊटमध्ये गेला. तिथे भारताने पाकिस्तानला नमवलं.

‘काळ्या जादूची जाणीव’

मिस्बाह उल हक त्यापुढे जाऊन म्हणालाा की, ‘पराभवानंतर त्या दिवशी मला काळ्या जादूची जाणीव झाली’ मिस्बाह ही गोष्ट मस्करीत बोलला. फक्त तो सामनाच नाही, त्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही भारताने पाकिस्तानला नमवलं होतं.