दुबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2021) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी एकतर्फी लढाई पाहायला मिळाली. हा सामना पाकिस्तानने अगदी सहज खिशात घातला. संपूर्ण भारतभर हा सामना मोठ्या उत्साहात पाहिला गेला. भारतीय चाहत्यांचा हिरमोड झाला पण हा सामना अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. सध्या सोशल मीडियावर या सामन्यासंदर्भात बऱ्याच गोष्टी शेअर केल्या जात आहेत. (India vs Pakistan : Virat Kohli hugs Mohammad Rizwan, Video viral on internet)
भारत आणि पाकचा सामना म्हटलं की भारतीयांच्या अंगात विरश्री संचारते. काहीही झालं तरी पाकिस्तानला नमवलंच पाहिजे असं प्रत्येक भारतीयाला वाटतं. पण क्रिकेट हा एक खेळ असल्यामुळे यामध्ये यशापयश या गोष्टी ओघाने आल्याच. हा सामना भारताने गमावला असला तरी सध्या टीम इंडियाचा मोठेपण आजच्या सामन्यात पाहायला मिळालं. पराभूत झाल्यानंतर कसलेही आढेवेढे न घेता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानी खेळाडूंचं अभिनंदन केलं. तसेच पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानला मिठी मारली. विराट आणि रिझवानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओ पाहा
This. #INDvPAK #ViratKohli pic.twitter.com/tnjAYNO0BC
— Tavleen Singh Aroor (@Tavysingh) October 24, 2021
Spirit of Cricket!! ??? pic.twitter.com/pH6UfrRcKf
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 24, 2021
अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सुरुवातीलाच खराब सुरुवात आणि सुमार फलंदाजीमुळे भारतीय संघ पराभूत झाला. आधी खराब फलंदाजीमुळे केवळ 151 धावा भारताने केल्या. ज्यानंतर पाकिस्तान संघाने अप्रतिम अशी फलंदाजी करत सामना 10 विकेट्सने खिशात घातला. विशेष म्हणजे पाकच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकं ठोकली.
After an intense battle, things you love to see ??#INDvPAK | #T20WorldCup pic.twitter.com/HXgqcGiCKt
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 24, 2021
सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.
152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीमध्ये एक वेगळाच क्लास दाखवला. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी उत्कृष्ट अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला खास तर नाही किमान सुमार गोलंदाजीही करता आली नाही. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला आहे.
इतर बातम्या :
India vs Pakistan | भारत-पाक मुकाबल्यात टीम इंडियाचा पराभव, अंपायरवर टीकेची झोड, मोठी चूक केली ?
India vs Pakistan | टीम इंडियाचे खेळाडू गुडघ्यावर बसले, अन् जगाने सलाम ठोकला, नेमकं कारण काय ?
(India vs Pakistan : Virat Kohli hugs Mohammad Rizwan, Video viral on internet)