मुंबई : भारतीय संघ सध्या साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. भारताचा हा दौरा अत्यंत महत्वाचा दौरा मानला जात आहे. जगात कोरोनाने कहर केला असताना टिम इंडिया मागे न हटता धाडसाने मैदानात उतरली आहे, फक्त मैदानातच नाही उतरली तर यजमान आफ्रिकेला पहिल्या कसोटीपासून वरचढ ठरताना दिसत आहे. त्यामुळे क्रिकेट जगतात भारतीय टिमचाच बोलबाला आहे. मात्र आता टीम इंडियापुढे नवा पेच तयार झाला आहे, कारण पुढच्या कसोटीत इशांत शर्माला संधी द्यायची की उमेश यादवला हा मुख्य प्रश्न कोच राहुल द्रवीड आणि कर्णधार विराट कोहलीसमोर असणार आहे.
टीम इंडिया इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर
केपटाऊनमध्ये टीम इंडिया जवळपास इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. शेवटच्या सामन्यात दोन्ही संघ बरोबरीने मैदानात उतरणार आहेत आणि सिरीज जिंकूण इतिहास रचण्याची संधी भारतीय टिमला मिळणार आहे. यावेळी खेळणाऱ्या अकरा खेळाडुंच्या सिलेक्शनवरून मॅनेजमेंटचे टेन्शन वाढले आहे. कारण मॅनेजमेंटला योग्य टीम घेऊन मैदानातर उतरावे लागणार आहे, तेव्हाच ऐतिहासिक विजय शक्य आहे. खासकरून भारतीय गोलंदाजांचे सिलेक्शन करणे कठिण झाले आहे, कारण इशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्यातील एकाची भूमिका यावेळी महत्वाची राहणार आहे. सेंचुरियन टेस्टमध्ये भारतासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजला दुखापतीचा सामना करावा लागत आहे. त्याचा हाच त्रास पुढच्या सामन्यात जाणवला तर मोठं नुकसान होऊ शकते.
इशांतच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो
इशांत शर्माला वेगवान गोलंदाजीचा खूप मोठा अनुभव आहे, त्याचा फायदा भारताला निश्चत होऊ शकतो. त्यामुळे मॅनेजमेंट त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला संधी देण्याची शक्यता आहे. जोहानसबर्ग टेस्टमध्ये पुऱ्या उंचीच्या गोलंदाची कमी सगळ्यांनाच जाणवल्याचे मत अनेक क्रिकेट जाणकारांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे इशांतला झुकतं माप मिळू शकते. मात्र भारतीय पिच असतं तर उमेश यादवच त्यांची पसंती असते असेही मत अनेकांनी नोंदवले आहे. भारत 1993 पासून या मैदानावर पाच मॅच खेळला आहे आणि एकही जिंकू शकला नाही, त्यामुळे हा सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी भारतीय टीपुढे आहे.