IND vs SA Match Preview: जे आतापर्यंत झालं नाही, ते टीम इंडिया करणार? दोन प्रमुख बॉलर्सची उणीव जाणवणार

| Updated on: Sep 27, 2022 | 7:26 PM

IND vs SA Match Preview: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 सीरीजमध्ये टीम इंडियाला इतिहास बदलण्याची संधी आहे.

IND vs SA Match Preview: जे आतापर्यंत झालं नाही, ते टीम इंडिया करणार? दोन प्रमुख बॉलर्सची उणीव जाणवणार
Team india
Follow us on

मुंबई: आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाच्या अनेक कमतरता दिसून आल्या. या कमतरता दूर करण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांमध्ये संधी आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला भले तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत हरवलं. पण अजूनही समस्या दूर झालेली नाही. बुधवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणारी तीन टी 20 सामन्याची सीरीज कमतरता दूर करण्याची शेवटची संधी आहे.

काय उद्देश असेल?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये टीम इंडियाला डेथ ओव्हर्समधील आपली गोलंदाजी सुधारावी लागेल. त्याशिवाय फलंदाजांना जास्तीत जास्त सराव मिळावा, हा त्यामागे उद्देश असेल.

इतिहास बदलण्याचा प्रयत्न

डेथ ओव्हर्समधील बॉलिंगच नाही, तर ओपनर्सनी जास्त धावा केलेल्या नाहीत, ही सुद्धा समस्या आहे. दक्षिण आफ्रिकन टीमने अजूनपर्यंत भारतात टी 20 सीरीज गमावलेली नाही. यावेळी हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न असेल.

टीमच जोरदार स्वागत

या सामन्यासाठी टीम इंडिया तिरुवनंतपुरम येथे दाखल झाली. त्यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. हॉटेलमध्ये फुल टाकून स्वागत करण्यात आलं. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या टि्वटर हँडलवर पोस्ट केलाय.

टीम इंडियाला दोघांची उणीव जाणवेल

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार या दोन प्रमुख गोलंदाजांची कमतरता जाणवेल. टी 20 वर्ल्ड कप आधी त्यांना आराम देण्यात आलाय.

मोहम्मद शमी अजूनही कोरोनामधून बरा झालेला नाही. हर्षल पटेलने दुखापतीनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरीजमध्ये पुनरागमन केलं. पण तो महागडा ठरला. त्याने 12 च्या सरासरीने धावा दिल्या.

आता चाहरला संधी मिळू शकेत

वर्ल्ड कपसाठी दीपक चाहर स्टँडबायवर आहे. मागच्या सीरीजमध्ये त्याला संधी मिळाली नाही. आता वेगवान गोलंदाजांना रोटेट करण्याच्या पॉलिसीमुळे त्याला संधी मिळू शकते.

चहलने कामगिरी सुधारली

अर्शदीप सिंहकडून डेथ ओव्हर्समध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्याच्या जोडीला जसप्रीत बुमराह असेल. युजवेंद्र चहलने पहिल्या दोन मॅचमध्ये मार खाल्ला. पण तिसऱ्या सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन विकेट्स लक्षात घेऊन चहल सुधारणेच्या इराद्याने मैदानात उतरेल.

टीम इंडिया : रोहित शर्मा ( कॅप्टन ), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.