मुंबई: T 20 क्रिकेट हा 120 चेंडूंचा खेळ आहे. टी 20 मध्ये जेव्हा कुठला संघ 200 पेक्षा जास्त धावसंख्या उभारतो, तेव्हा त्या टीमचा विजय पक्का मानला जातो. पण त्यासाठी दुसऱ्याबाजूने म्हणजे गोलंदाजांकडून साथ मिळणं, सुद्धा तितकच आवश्यक आहे. अन्यथा गोलंदाजीची बाजू कमकुवत असेल, तर इतकी मोठी धावसंख्या उभारुनही फायदा नसतो. कालच्याच सामन्याचा आपल्याला उद्हारण घेता येईल. 211 धावांचा डोंगर उभा करुनही दक्षिण आफ्रिकेने भारतावर (IND vs SA) अत्यंत सहजतेने मात केली. याच कारण होतं, भारताची कमकुवत गोलंदाजी. डेविड मिलर (David Miller) आणि रासी वॅन डार डुसे यांनी भारताच्या दुबळ्या गोलंदाजीची पुरेपूर फायदा उचलला व खोऱ्याने धावा लुटल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 64 चेंडूत नाबाद 131 धावांची विजयी भागीदारी केली. भारताच्या पराभवाच मुख्य कारण आहे गोलंदाजी. भारतीय गोलंदाजांनी काय चूक केली? ते समजून घ्या.
हर्षल पटेल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या या सर्व गोलंदाजांचा इकॉनमी रेट प्रति ओव्हर 10 पेक्षा जास्त होता. सर्वच गोलंदाजांनी खराब दिशा आणि टप्प्यावर गोलंदाजी केली. टेंबा बावुमा आणि क्विंटन डि कॉक आऊट झाल्यानंतर भारतीय गोलंदाजीची दिशा भरकटली. ड्वेन प्रिटोरियसला मध्यमगती गोलंदाज असो किंवा स्पिन गोलंदाज सर्वांनी स्लॉटमध्ये गोलंदाजी केली. म्हणजे भारतीय गोलंदाजी खूपच खराब दर्जाची गोलंदाजी केली. ज्यामुळे मिलर-डुसे जोडीला ते चेंडू सीमापार पोहोचवण्यात कुठलीही अडचण आली नाही.
दक्षिण आफ्रिकेला कालच्या सामन्यात शेवटच्या 10 षटकात विजयासाठी 126 धावांची आवश्यकता होती. सामना खरंतर भारताने जिंकायला पाहिजे होता. पण गोलंदाजी खराब गोलंदाजीत कुठलीही कमतरता ठेवली नाही. हर्षल पटेलने अनेक फुलटॉस चेंडू टाकले. अक्षर पटेलची पण हीच स्थिती होती. युजवेंद्र चहलने सुद्धा सहज फटके खेळता येतील, अशी गोलंदाजी केली. हार्दिक पंड्याच्या एका ओव्हरमध्ये तीन षटकार लगावले. त्यानंतर पंतने त्याच्याकडे चेंडू दिला नाही. भुवनेश्वर कुमार सारख्या अनुभवी गोलंदाजाने यॉर्कर गोलंदाजी केली नाही. ज्याचा फायदा दक्षिण आफ्रिकेने उचलला.