मुंबई: ऑस्ट्रेलियाला 2-1 ने हरवल्यानंतर टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेच आव्हान आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम अलीकडेच टीम इंडिया विरुद्ध टी 20 सीरीज खेळली होती. पाच सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली होती. कारण अखेरचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये फार मोठे खेळाडू नाहीयत. पण हे खेळाडू त्यांचा दिवस असेल, तर ते कुठल्याही टीमवर भारी पडू शकतात.
खासकरुन टी 20 फॉर्मेटमध्ये दक्षिण आफ्रिकन टीमची कामगिरी नेहमीच वेगळी राहिली आहे. टी 20 सीरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडच्या टीमला त्यांच्याच घरात हरवलं होतं.
आता मजबूत टीम इंडिया मैदानात उतरेल
टीम इंडियाचा त्यांच्याच घरच्या मैदानावर सामना करणं, दक्षिण आफ्रिकेसाठी इतकं सोपं नाहीय. जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेची टीम भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळी टी 20 टीममध्ये अनेक मोठे खेळाडू नव्हते. पण आता टीम इंडियाची मजबूत टीम मैदानात उतरणार आहे. टीमच नेतृत्व रोहित शर्माच्या हातात आहे.
विराट कोहली, सूर्यकुमार यादव हे फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आपलं कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज आहेत. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिला टी 20 सामना कुठे पाहू शकता ते जाणून घ्या.
कधी, कुठे आणि कसा पाहू शकता सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला T20 सामना कुठे खेळला जाणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला T20 सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळला जाणार.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला T20 सामना कधी होणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला T20 सामना 28 सप्टेंबरला खेळला जाणार.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला टी 20 सामना किती वाजता सुरु होणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला टी 20 सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार. मॅचचा टॉस संध्याकाळी 6.30 वाजता उडवला जाईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या T20 सामन्याचं थेट प्रसारण कुठे होणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या T20 सामन्यांच लाइव्ह प्रसारण Star Sports Network च्या वेगवेगळ्या चॅनलवर केलं जाईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या T20 मॅचच लाइव स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या T20 मॅचच लाइव स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर पाहू शकता.