IND vs SA 2nd ODI: हेनड्रीक्स-मार्करामने सावरला डाव, टीम इंडियासमोर विजयासाठी मोठं लक्ष्य

| Updated on: Oct 09, 2022 | 5:27 PM

IND vs SA 2nd ODI: टीम इंडियाकडे आज मालिकेत बरोबरी साधण्याची संधी

IND vs SA 2nd ODI: हेनड्रीक्स-मार्करामने सावरला डाव, टीम इंडियासमोर विजयासाठी मोठं लक्ष्य
Team india
Follow us on

मुंबई: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) दुसरा वनडे सामना सुरु आहे. रांचीच्या (Ranchi) जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये ही मॅच चालू आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन केशव महाराजने (Keshav Maharaj) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली होती. ओपनर क्विटंन डि कॉकच्या रुपाने 7 धावांवर आफ्रिकेला पहिला झटका बसला होता. मोहम्मद सिराजने डि कॉकला 5 धावांवर बोल्ड केलं.

डेब्यु करणाऱ्या शाहबाजची पहिली विकेट

त्यानंतर जानेमन मालान आणि रिझा हेनड्रीक्सने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण टीमच्या 40 धावा धावफलकावर लागल्या होत्या. त्यावेळी मालान बाद झाला. डेब्यु करणाऱ्या शाहबाज अहमदने त्याला 25 धावांवर पायचीत पकडलं.

रिझा हेनड्रीक्स-एडन मार्करामने सावरला डाव

दोन विकेट लवकर गेल्यानंतर रिझा हेनड्रीक्स आणि एडन मार्करामने दक्षिण आफ्रिकेच्या डावाला आकार दिला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी केली. रिझा 74 धावांवर बाद झाला. 76 चेंडू खेळताना त्याने 9 चौकार आणि 1 षटकार लगावला.

एडन मार्करामने 89 चेंडूत 79 धावा फटकावल्या. यात 7 चौकार आणि 1 षटकार होता. रिझा हेनड्रीक्सला मोहम्मद सिराजने अहमदकरवी कॅच आऊट केलं. मार्करामला वॉशिंग्टन सुंदरने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

टीम इंडियासमोर किती धावांचे लक्ष्य?

दक्षिण आफ्रिकेकडून हीनरीच क्लासेनने 30 आणि डेविड मिलरने नाबाद 35 धावा फटकावल्या. निर्धारित 50 ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रिकेने 7 बाद 278 धावा केल्या. टीम इंडियासमोर विजयासाठी 279 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

टीम इंडियाकडून कोणी किती विकेट घेतल्या?

टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज यशस्वी गोलंदाज ठरले. त्याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.