पार्ल: बोलँड पार्कच्या (Boland park) स्टेडियमवर आज भारतीय संघ दुसरा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरेल, तेव्हा मालिका बरोबरीत आणण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पार्लमध्ये (Paarl) बुधवारी पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) भारताचा 31 धावांनी पराभव केला. विराट कोहली (Virat Kohli) कर्णधारपद भूषवत असल्यापासून मधली फळी भारतीय संघाची अडचण ठरली आहे.
मधल्याफळीवर काही तोडगा आहे का?
कसोटीमध्ये मधल्याफळीमुळेच भारताचा डाव सातत्याने अडचणीत आला. पहिल्या वनडेमध्ये मधल्याफळीमुळेच भारताचा पराभव झाला. पहिल्या वनडेमध्ये भारताने काही चुका केल्या, त्यामधून त्यांना धडा घ्यावा लागेल. उदहारणार्थ वेंकटेश अय्यरला गोलंदाजी द्यायची नसेल, तर त्याच्याऐवजी ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव हे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
जाणून घ्या वेदर रिपोर्ट
भारत उद्या चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. हवामानामुळे सामन्यात कुठली बाधा येणार नाही अशी माहिती आहे. पार्लमध्ये पाऊस पडण्याची शक्यता शुन्य टक्के आहे. उद्या पार्लमध्ये चांगलं लख्ख ऊन पडलेलं असेल, असं हवामान विभागाचं भाकीत आहे. कसोटी मालिकेत पावसाने व्यत्यय आणला होता.
Accu वेदरनुसार, गुरुवारपेक्षा शुक्रवारी उष्ण वातावरण असेल. सकाळी आणि दुपारी चांगला सूर्यप्रकाश असेल. 40 डीग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असेल. दिवसभरात 100 षटकांचा खेळ होण्यासाठी एकदम परफेक्ट हवामान असेल.
संभाव्य भारतीय संघ –
रुतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह,
India vs South Africa 2nd ODI Weather Forecast Will rain play spoilsport in Paarl?