IND vs SA 3rd T 20I:भारताला आज सामना जिंकावाच लागणार होता. भारतीय संघाने आज अपेक्षित कामगिरी केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर (IND vs SA) पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. दक्षिण आफ्रिकेला कुठेही डोक वर काढण्याची संधी दिली नाही. पूर्णपणे सामन्यावर नियंत्रण गाजवलं. ‘करो या मरो’, सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 48 धावांनी मोठा विजय मिळवला. भारताने विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य दिले होते. दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित 20 षटकात 131 धावांवर ऑलआऊट झाला.
भारत: ऋषभ पंत (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, आवेश खान,
दक्षिण आफ्रिका: टेंबा बावुमा (कॅप्टन), रीजा हेंड्रिक्स, ड्वेन प्रिटोरियस, रासी वॅन डर डुसे, हेनरिख क्लासेन, डेविर मिलर, वेन पार्नेल, कगिसो रबाडा, केशव महाराज, तबरेज शम्सी, एनरिख नॉर्खिया,
‘करो या मरो’, सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 48 धावांनी मोठा विजय मिळवला. भारताने विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य दिले होते. दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित 20 षटकात 131 धावांवर ऑलआऊट झाला.
18 षटकात दक्षिण आफ्रिकेच्या सात बाद 126 धावा झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 12 चेंडूत 54 धावांची आवश्यकता आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या 15 षटकात 6 बाद 102 धावा झाल्या आहेत. या ओव्हरमध्ये युजवेंद्र चहलने हेनरिख क्लासेनला 29 धावांवर अक्षर पटेल करवी झेलबाद केलं.
दक्षिण आफ्रिकेचा डाव अडचणीत सापडला आहे. 10 ओव्हर्समध्ये त्यांच्या चार बाद 63 धावा झाल्या आहेत. युजवेंद्र चहलने प्रिटोरियस (20) आणि डुसेला (1) रन्सवर आऊट केलं.
हर्षल पटेलने दक्षिण आफ्रिकेला दुसरा झटका दिला आहे. पावरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दोन बाद 38 धावा झाल्या आहेत. रीजा हेंड्रिक्सला 23 धावांवर हर्षल पटेलने युजवेंद्र चहलकरवी झेलबाद केलं.
भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका दिला आहे. अक्षर पटेलने कॅप्टन टेंबा बावुमाला 8 रन्सवर आवेश खानकरवी झेलबाद केलं. पहिल्या चार षटकात दक्षिण आफ्रिकेच्या एक बाद 23 धावा झाल्या आहेत.
ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांनी भारताला आज चांगली सुरुवात करुन दिली होती. दोन्ही सलामीवीरांनी (57) आणि (54) धावांची अर्धशतकी खेळी केली. पण अन्य फलंदाजांनी त्यावर पाणी फिरवलं. श्रेयस अय्यर (14), इशान किशन (54) आणि कॅप्टन ऋषभ पंत (6) धावांवर झटपट आऊट झाले. अखेरीस हार्दिक पंड्याने थोडीफार फटकेबाजी केली. त्याने 21 चेंडूत 31 धावा केल्या. त्यामुळे भारताला 179 धावांपर्यंत पोहोचता आले. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये भारताने एक बाद 97 धावा केल्या होत्या. पण नंतर 10 षटकात फक्त 82 धावा निघाल्या. एकवेळ भारताची धावसंख्या 200 पार जाईल असं वाटत होतं, पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना श्रेय द्याव लागेल.
दिनेश कार्तिक 6 धावांवर आऊट झाला. राबाडाने त्याला पार्नेलकरवी झेलबाद केलं.
भारताच्या 18 षटकात चार बाद 156 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या 14 आणि दिनेश कार्तिक पाच धावांवर खेळतोय.
दमदार सुरुवातीनंतर भारताचा डाव अडचणीत आला आहे. श्रेयस अय्यर (14), इशान किशन (54) आणि कॅप्टन ऋषभ पंत (6) धावांवर आऊट झाले. मागच्या चार षटकात भारताच्या तीन विकेट्स गेल्या आहेत. 17 षटकात भारताच्या 4 बाद 148 धावा झाल्या आहेत.
ऋतुराज OUT झाला. पण इशान किशनचा झंझावत कायम आहे. त्याने 31 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली. भारताच्या 12 षटकात एक बाद 120 धावा झाल्या आहेत.
दमदार फलंदाजी करणारा ऋतुराज गायकवाड 57 धावांवर आऊट झाला. त्याने 35 चेंडूत 57 धावा फटकावल्या. यात 7 चौकार आणि 2 षटकार होते. भारताच्या 10 षटकात एक बाद 97 धावा झाल्या आहेत.
7 ओव्हर्समध्ये भारताच्या बिनबाद 67 धावा झाल्या आहेत. ऋतुराज गायकवाड 25 चेंडूत 46 आणि इशान किशन 21 धावांवर खेळतोय.
पॅकेज डी मध्ये प्रतिसामना बेस प्राइस 3 कोटी रुपये होती. यात परदेशातील प्रसारण हक्क आणि डिजिटल राइट्सचा समावेश होता. वायकॉम 18 आणि टाइम्स इंटरनेटला 1324 कोटींना हे हक्क विकले गेले. एकूण 48,390 कोटींना हे हक्क विकले गेले.
ऋतुराज गायकवाडने एनरिख नॉर्खियाला एक ओव्हरमध्ये पाच चौकार लगावले. त्याने पाच चेंडूंवर सलग पाच चौकार लगावले. भारताच्या पाच षटकात बिनबाद 48 धावा झाल्या आहेत.
रिलायन्स समूहातील वायकॉम 18 ने डिजिटल प्रसारणाचे हक्क 20,500 कोटींना विकत घेतले आहेत. पॅकेज सी चे अधिकारही 2991 कोटींना विकत घेतलेत.
डिज्नी स्टारने भारतीय उपखंडासाठीचे टीवी हक्क 23,575 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.
दोन ओव्हर्समध्ये भारताच्या बिनबाद 10 धावा झाल्या आहेत. ऋतुराज गायकवाड पाच आणि इशान किशन पाच धावांवर खेळतोय.
दक्षिण आफ्रिका: टेंबा बावुमा (कॅप्टन), रीजा हेंड्रिक्स, ड्वेन प्रिटोरियस, रासी वॅन डर डुसे, हेनरिख क्लासेन, डेविर मिलर, वेन पार्नेल, कगिसो रबाडा, केशव महाराज, तबरेज शम्सी, एनरिख नॉर्खिया,
भारत: ऋषभ पंत (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, आवेश खान,