IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (IND vs SA) जबरदस्त कमबॅक केलं आहे. भारताने आज राजकोट (Rajkot) सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर झालेला सामना 82 धावांनी जिंकला. या विजयामुळे दोन्ही संघ आता 2-2 बरोबरीत आहेत. भारताच्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 17 षटकात 87 धावात आटोपला. आता रविवारी होणारा पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिले दोन टी 20 सामने जिंकल्यामुळे भारतीय संघ 2-0 असा पिछाडीवर होता. पण विशाखापट्टनममधील तिसऱ्या आणि आज चौथ्या सामन्यात विजय मिळवून जोरदार कमबॅक केलय.
भारत: ऋषभ पंत (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, आवेश खान,
दक्षिण आफ्रिका: टेंबा बावुमा (कॅप्टन), ड्वेन प्रिटोरियस, रासी वॅन डर डुसे, हेनरिख क्लासेन, डेविड मिलर, केशव महाराज, तबरेज शम्सी, एनरिख नॉर्खिया, क्विंटन डि कॉक, मार्को जॅनसेन, लुंगी निगीडी,
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (IND vs SA) जबरदस्त कमबॅक केलं आहे. भारताने आज राजकोट (Rajkot) सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर झालेला सामना 82 धावांनी जिंकला. या विजयामुळे दोन्ही संघ आता 2-2 बरोबरीत आहेत.
दक्षिण आफ्रिका पूर्णपणे बॅकफूटवर गेली आहे. त्यांची सातवी विकेट गेली आहे. केशव महाराजाला शुन्यावर आवेश खानने आऊटक केलं. त्यांची स्थिती 78/7 अशी आहे.
दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. आवेश खानने यश मिळवून दिलं. रासी डुसेने 20 धावांवर ऋतुराज गायकवाडकडे झेल दिला. आफ्रिकेच्या 74/5 धावा झाल्या आहेत.
13 षटकात दक्षिण आफ्रिकेच्या चार बाद 73 धावा झाल्या आहेत. रासी डुसे आणि मार्को जॅनसेनची जोडी मैदानावर आहे.
11 षटकात दक्षिण आफ्रिकेच्या चार बाद 59 धावा झाल्या आहेत. डेविड मिलरला 9 रन्सवर हर्षल पटेलने बोल्ड केलं.
भारताला दुसरं यश मिळालं आहे. आवेश खानने ड्वेन प्रिटोरियसला ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. तो शुन्यावर आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेच्या दोन बाद 32 धावा झाल्या आहेत.
सावध फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट गेली आहे. क्विंटन डि कॉकच्या रुपाने भारताला मोठी विकेट मिळाली. डि कॉकला 14 धावांवर हर्षल पटेलने रनआऊट केलं. कॅप्टन टेंबा बावुमा 8 धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. पाच षटकात त्यांच्या 1 बाद 25 धावा झाल्या आहेत.
दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या आज संकटमोचक ठरले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 65 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दिनेश कार्तिकने 27 चेंडूत 55 आणि हार्दिक पंड्याने 31 चेंडूत 46 धावा फटकावल्या. या दोघांच्या बळावर भारताने निर्धारित 20 षटकात 6 बाद 169 धावा केल्या.
.@DineshKarthik was the pick of the #TeamIndia batters and was our top performer from the first innings of the fourth @Paytm #INDvSA T20I. ? ?
A summary of his knock ? pic.twitter.com/L5ngT7WE5B
— BCCI (@BCCI) June 17, 2022
केशव महाराज टाकत असलेल्या 17 व्या षटकात दिनेश कार्तिकने सलग तीन चौकार लगावले. भारताच्या चार बाद 124 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या 39 आणि कार्तिक 28 धावांवर खेळतोय.
13 षटकात भारताच्या 4 बाद 81 धावा झाल्या आहेत. कॅप्टन ऋषभ पंत आजही फ्लॉप ठरला. 17 धावांवर केशव महाराजने त्याला प्रिटोरियसकरवी झेलबाद केलं.
भारताच्या दहा षटकात 3 बाद 56 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत 9 आणि हार्दिक पंड्या 8 धावांवर खेळतोय. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना दबावाखाली ठेवलय.
इशान किशनच्या रुपाने भारताला तिसरा झटका बसला आहे. 6.1 षटकात भारताची स्थिती तीन बाद 40 आहे. इशान किशनने 27 धावा केल्या. यात तीन चौकार आणि एक षटकार आहे.
पावरप्लेमधील शेवटच म्हणजे 6 वी ओव्हर टाकणाऱ्या ड्वेन प्रिटोरियसने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने अवघी एक धाव दिली. भारताच्या दोन बाद 40 धावा झाल्या आहेत.
पाच षटकात भारताच्या दोन बाद 38 धावा झाल्या आहेत. जॅनसेनच्या या ओव्हरमध्ये पहिल्या दोन चेंडूंवर इशान किशनने सलग दोन चौकार लगावले.
चार षटकांचा खेळ पूर्ण झाला असून भारताच्या दोन बाद 27 धावा झाल्या आहेत. कॅप्टन ऋषभ पंत आणि इशान किशन मैदानात आहे.
भारताला दुसरा झटका बसला आहे. श्रेयस अय्यर 4 धावांवर आऊट झाला. मार्को जॅनसनने त्याला पायचीच पकडलं. या निर्णयासाठी डीआरएसचा वापर करण्यात आला. भारताच्या तीन ओव्हर्समध्ये दोन बाद 24 धावा झाल्या आहेत. या ओव्हरमध्ये जॅनसेला एक चौकार आणि षटकार खेचला होता.
भारताला पहिला झटका बसला आहे. ऋतुराज गायकवाड 5 धावांवर बाद झाला. लुंगी निगीडीच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विकेटकीपर क्विंटन डि कॉक कडे सोपा झेल दिला. भारताच्या दोन षटकात एक बाद 13 धावा झाल्या आहेत.
मार्को जॅनसनने पहिलं षटक टाकलं. भारताच्या बिनबाद 8 धावा झाल्या आहेत. इशान किशन, ऋतुराज गायकवाड ही सलामीची जोडी मैदानात आहेत. इशानने या ओव्हरमध्ये चौकार लगावला.
दक्षिण आफ्रिका: टेंबा बावुमा (कॅप्टन), ड्वेन प्रिटोरियस, रासी वॅन डर डुसे, हेनरिख क्लासेन, डेविड मिलर, केशव महाराज, तबरेज शम्सी, एनरिख नॉर्खिया, क्विंटन डि कॉक, मार्को जॅनसेन, लुंगी निगीडी,
भारत: ऋषभ पंत (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, आवेश खान,
दक्षिण आफ्रिकेच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. कागिसो रबाडा, रीजा हेंड्रिंग्स आणि वेन पार्नेल यांना वगळण्यात आलय. त्यांच्याजागी क्विंटन डि कॉक, मार्को जॅनसेन आणि लुंगी निगीडी यांचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आलाय.
दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेंबा बावुमाने टॉस जिंकला असून त्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.