India vs South Africa, 5th T20 LIVE : पावसामुळे अखेर सामना रद्द, सीरीजमध्ये 2-2 ची बरोबरी

| Updated on: Jun 19, 2022 | 10:39 PM

India vs South Africa 2022, 5th T20 LIVE Score and Updates in Marathi: दोन्ही संघ मालिकेत 2-2 बरोबरीत आहेत. आजचा सामना जिंकणारा संघ विजयी चषक उंचावेल.

India vs South Africa, 5th T20 LIVE : पावसामुळे अखेर सामना रद्द, सीरीजमध्ये 2-2 ची बरोबरी
India vs south Africa
Follow us on

IND vs SA: पाचवा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याच भारताचं स्वप्न अखेर पूर्ण होऊ शकलं नाही. पावसाने भारताच्या मार्गात खोडा घातला. त्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका (IND vs SA) पाच सामन्यांची टी 20 सीरीज 2-2 अशी बरोबरीत सुटली. भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका विजय मिळवण्याच्या ऋषभ पंतच्या (Rishabh pant) स्वप्नावर पावसाने पाणी फिरवलं. भारताला अजून मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीजमध्ये मालिका विजय मिळवता आलेला नाही. टेंबा बावुमा दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळत नव्हता. त्याच्याजागी केशव महाराजकडे (Keshav Maharaj) दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व होतं.

अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11
ऋषभ पंत (कॅप्टन), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान आणि युजवेंद्र चहल

अशी आहे दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग 11
केशव महाराज (कॅप्टन), क्विंटन डि कॉक, आर. हेंड्रीक्स, वॅन डार डुसे, एच क्लासेन, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्बस, ड्वेयन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, एनरिख नॉर्खिया, लुंगी निगीडी,

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 19 Jun 2022 09:51 PM (IST)

    सततच्या पावसामुळे अखेर सामना रद्द

    पाऊस थांबला नाही आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी शेवटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही सीरीज 2-2 अशा बरोबरीत संपली आहे.

  • 19 Jun 2022 09:26 PM (IST)

    अजूनही पाऊस सुरुच

    बेंगळुरुमध्ये अजूनही पाऊस सुरुच आहे. पाऊस थांबलेला नाही. असच सुरु राहिलं, तर आणखी काही षटकं कमी होऊ शकतात.

  • 19 Jun 2022 08:23 PM (IST)

    पावसामुळे पुन्हा थांबला सामना

    भारत-दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या सामन्यात पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय आणला आहे. 3.3 षटकात भारताची स्थिती 28/2 आहे.

  • 19 Jun 2022 08:06 PM (IST)

    ऋतुराज गायकवाड बाद

    चौथ्या ओव्हरमध्ये भारताला दुसरा झटका बसला आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड प्रिटोरियसकरवी 10 धावांवर झेलबाद झाला. लुंगी निगीडीनेच हा विकेट काढला. भारताच्या 3.2 षटकात दोन बाद 27 धावा झाल्या आहेत.

  • 19 Jun 2022 08:00 PM (IST)

    भारताला पहिला झटका, इशान किशन OUT

    भारताला पहिला झटका बसला आहे. इशान किशन OUT झाला. लुंगी निगीडीने त्याला बोल्ड केलं. इशान किशनने 15 धावा केल्या. दोन षटकात भारताच्या एक बाद 20 धावा झाल्या आहेत.

  • 19 Jun 2022 07:54 PM (IST)

    भारताची आक्रमक सुरुवात

    भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये सामना सुरु झाला आहे. सलामीवीर इशान किशनने आक्रमक सुरुवात केली आहे. कॅप्टन केशव महाराजने पहिलं षटक टाकलं. या ओव्हरमध्ये बिनबाद 16 धावा झाल्या. दोन षटकार मारले.

  • 19 Jun 2022 07:43 PM (IST)

    पावासामुळे सामन्यात एक छोटासा बदल

    पावासामुळे सामन्यात एक छोटासा बदल करण्यात आला आहे. आता 20 ऐवजी 19 षटकांचा सामना होणार आहे.

  • 19 Jun 2022 07:29 PM (IST)

    बंगळुरुमध्ये पाऊस थांबला, थोड्याच वेळात सुरु होणार सामना

    बंगळुरुमध्ये पाऊस थांबला असून थोड्याच वेळात सामना सुरु होईल. अंपायर ग्राऊडसमन सोबत बोलत आहेत. काही वेळातच पाणी मैदानाबाहेर काढण्याचं काम सुरु होईल.

  • 19 Jun 2022 07:07 PM (IST)

    एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पावसाला सुरुवात

    सामना सुरु होणार होता पण तितक्यात बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खेळाडू पुन्हा पॅव्लेयिनमध्ये गेले आहेत. सामना सुरु होण्याच्यावेळी पाऊस येईल असा अंदाज आधीच हवामान विभागाने वर्तवला होता.

  • 19 Jun 2022 06:47 PM (IST)

    दक्षिण आफ्रिकेच्या संघात आज तीन बदल

    दक्षिण आफ्रिकेच्या संघात आज तीन बदल करण्यात आले आहेत. कॅप्टन टेंबा बावुमा दुखापतग्रस्त आहे. तबरेज शम्सी आणि मार्को जॅनसेन यांच्याजागी ट्रिस्टन स्टब्बस, रीझा हेंड्रीक्स आणि कागिसो रबाडाला संघात स्थान देण्यात आलय.

  • 19 Jun 2022 06:44 PM (IST)

    अशी आहे दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग 11

    केशव महाराज (कॅप्टन), क्विंटन डि कॉक, आर. हेंड्रीक्स, वॅन डार डुसे, एच क्लासेन, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्बस, ड्वेयन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, एनरिख नॉर्खिया, लुंगी निगीडी,

  • 19 Jun 2022 06:41 PM (IST)

    अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11

    ऋषभ पंत (कॅप्टन), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान आणि युजवेंद्र चहल

  • 19 Jun 2022 06:38 PM (IST)

    दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला

    दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची प्रथम फलंदाजी आहे.