सेंच्युरियन: दक्षिण आफ्रिका दौऱ्याची भारताने विजयी सुरुवात केली आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सेंच्युरियनवर पहिला कसोटी सामना जिंकला आहे. भारताला या मैदानावर कधीही सामना जिंकता आला नव्हता. विजयानंतर विराट कोहलीने समालोचकांशी बोलताना मयांक आणि केएल राहुलचे कौतुक केले. (India vs South Africa After centurion win against south Africa virat Kohlis First Reaction)
“आम्हाला जशी सुरुवात हवी होती, तशी परफेक्ट सुरुवात मिळाली. चार दिवसात सामन्याचा निकाल लागला, त्यावरुन आम्ही किती चांगला खेळ केला, ते स्पष्ट होते. दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट खेळणं इतकं सोप नाहीय. पण फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही विभागात आम्ही चांगली कामगिरी केली” असे विराटने सांगितले.
“या कामगिरीचे सर्वाधिक श्रेय मयांक आणि केएल राहुलला जाते. पहिल्या दिवशी तीन बाद 270 धावांमुळे आम्ही मजबूत स्थितीमध्ये होतो. आम्हाला आमच्या गोलंदाजांवर विश्वास होता. आम्ही या बद्दल बोललो होतो. आमच्या सर्व गोलंदाजांनी मिळून ज्या पद्धतीची गोलंदाजी केली, ते खरच कौतुकास्पद आहे. शामी वर्ल्ड-क्लास गोलंदाज आहे. शामीने जी कामिगरी केली आणि त्याच्या खात्यात 200 विकेट जमा झाल्या त्याबद्दल मनापासून आनंद वाटतो” असे विराट म्हणाला.