डरबन: केपटाऊन (Capetown test) येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या (south Africa) एकबाद 17 धावा झाल्या आहेत. मार्कराम (8) आणि केशव महाराजची (6) जोडी मैदानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अजूनही 206 धावांनी पिछाडीवर आहे. कॅप्टन डीन एल्गरच्या रुपाने पहिला झटका बसला आहे. एल्गर तीन धावांवर बाद झाला. बुमराहने त्याला पुजाराकरवी झेलबाद केले. कोहलीच्या झुंजार (79) (Virat kohli) धावा तर दक्षिण आफ्रिकेची भेदक गोलंदाजी आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.
पहिल्या दोन कसोटीप्रमाणे केपटाऊनमध्येही भारतीय फलंदाजी ढेपाळली. परिणामी भारताचा डाव 223 धावांवर संपुष्टात आला. या धावसंख्येचे रक्षण करण्यासाठी उद्या भारतीय गोलंदाजांना कमाल करावी लागेल.
वेगवाने गोलंदाजांना अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीचा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला व भारताला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. विराट कोहलीचा अपवाद वगळता भारताकडून चेतेश्वर पुजाराने (43) धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त अन्य फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत.
That will be STUMPS on Day 1 of the 3rd Test.
South Africa 17/1, trail #TeamIndia (223) by 206 runs.
Scorecard – https://t.co/9V5z8QBOjM #SAvIND pic.twitter.com/PZx8Lil2gM
— BCCI (@BCCI) January 11, 2022
दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने सर्वाधिक चार तर मार्को जॅनसेनने तीन विकेट घेतल्या. अन्य तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. विराट कोहलीने शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहून फलंदाजी केली. त्यामुळे भारताला 223 धावांपर्यंत पोहोचता आले. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात डीन एल्गरने अशा खेळपट्ट्यांवर कशी फलंदाजी केली जाते ते दाखवून दिले होते. पण कोहली वगळता अन्य फलंदाज काही शिकले नाहीत. आता सर्वकाही गोलंदाजांवर अवलंबून आहे.