केपटाऊन: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला (Dean Elgar) काल DRS सिस्टिमने नाबाद ठरवलं. त्यावरुन मैदानात भारतीय कॅप्टन विराट कोहलीसह अन्य खेळाडूंनी जे वर्तन केलं, त्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. वेगवेगळ्या माजी क्रिकेटपटूंनी, क्रिकेट रसिकांनी विराट आणि टीम इंडियावर टीका केली आहे. अश्विनच्या (Ashwin) गोलंदाजीवर मैदानावरील पंचांनी एल्गरला बाद ठरवलं होतं. पण DRS चा कॉल घेतला. त्यामध्ये चेंडू स्टंम्पवरुन जाताना दिसला.
आपल्या भावना रोखता आल्या नाहीत
तिसऱ्या पंचांनी एल्गरला नाबाद ठरवलं. तो सामन्यात असा एक क्षण होता, जिथे भारताला विकेटची खूप गरज होती आणि पीटरसन-एल्गरची भागीदारी तोंडण सुद्धा गरजेचं होतं. त्यावेळी विराट, अश्विन आणि राहुलला आपल्या भावना रोखता आल्या नाहीत. त्यांनी थेट स्टंम्पजवळ जाऊन आपला राग व्यक्त केला. जेणेकरुन सर्वांनाच ते काय बोलले, ते समजाव.
काहीवेळा संघाला त्याचा फायदा होतो
“अशा प्रकारच्या प्रतिक्रियेमधून तुमचं नैराश्य दिसून येतं. काहीवेळा संघाला त्याचा फायदा होतो. तुम्हाला इतक्या भावना दाखवायच्या नसतात. पण त्यावेळी भावना खूपच तीव्र होत्या. यातून भारतीय संघावर थोडासा दबाव दिसून आला” असे लुंगी निगीडी दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाला.
“पीटरसन आणि एल्गरमध्ये झालेली ती भागदारी खरोखरच आमच्यासाठी चांगली होती. त्यांना ती पार्टनरशिप तोडायची होती. त्या भावना तिथे व्यक्त झाल्या. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धती व्यक्त होतो. पण तिथे आम्ही जे पाहिले, त्या त्यांच्या भावना होत्या” असे लुंगी निगीडी म्हणाला.