Ind vs SA: रोहित शर्माचा मित्रच सेंच्युरियनमध्ये भारतासाठी ठरु शकतो घातक, विराटलाही केलं होतं हैराण

| Updated on: Dec 26, 2021 | 2:39 PM

मार्को जॅनसेन एक ऑलराऊडर क्रिकेटर आहे. वयाच्या 9 व्या वर्षी त्याने टी-20 सामन्यात थेट 164 धावा फटकावल्या होत्या. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने विराट कोहलीला सुद्धा चकवले होते.

Ind vs SA: रोहित शर्माचा मित्रच सेंच्युरियनमध्ये भारतासाठी ठरु शकतो घातक, विराटलाही केलं होतं हैराण
Follow us on

जोहान्सबर्ग: सेंच्युरियनमध्ये (Centurion Test) भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (Ind vs SA) पहिला कसोटी सामना सुरु आहे. दोन्ही संघांनी आपली प्लेइंग इलेवन जाहीर केली आहे. दक्षिण आफ्रिकेने निवडलेल्या संघातील एकानावाने लक्ष वेधून घेतले आहे. मार्को जॅनसेन असे या खेळाडूचे नाव आहे. मार्को जॅनसेन बरोबर रोहित शर्माची जुनी मैत्री आहे. जॅनसेन एक गोलंदाज आहे. दक्षिण आफ्रिका जॅनसेनचा भारताविरोधात मुख्य अस्त्र म्हणून वापर करु शकते.

रोहित शर्मा बरोबर जॅनसेनची मैत्री कशी?
आयपीएलमध्ये मार्को जॅनसेन मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. मुंबईने 20 लाख रुपयांमध्ये जॅनसेनला खरेदी केले होते. मुंबईकडून एकत्र खेळताना रोहित आणि जॅनसेनची मैत्री झाली.

मार्को जॅनसेन किती घातक?
मार्को जॅनसेन एक ऑलराऊडर क्रिकेटर आहे. वयाच्या 9 व्या वर्षी त्याने टी-20 सामन्यात थेट 164 धावा फटकावल्या होत्या. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने विराट कोहलीला सुद्धा चकवले होते. 2018 मध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. त्यावेळी वाँडर्सच्या मैदानावर विराटमध्ये नेट प्रॅक्टीस करत होता. मार्को जॅनसेन नेट बॉलर म्हणून विराटला गोलंदाजी करत होता. यावेळी जॅनसेनने एकदा नाही, तर तीनदा विराटला बीट केले होते. विराटने त्यावेळी वेल बॉल म्हणून जॅनसेनचे कौतुकही केले होते.