IND vs SA, H2H Records: जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियाचं पारडं जड, विराट अँड कंपनीकडे इतिहास घडवण्याची संधी

| Updated on: Jan 02, 2022 | 12:47 PM

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेची स्थिती करा किंवा मरा अशी असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी आहे.

1 / 6

2 / 6
दक्षिण आफ्रिकेचा संघ जोहान्सबर्ग कसोटी जिंकू शकला नाही, येथे त्यांचा पराभव झाला तर त्यांना मालिका देखील गमवावी लागेल. असे झाल्यास भारताविरुद्ध घरच्या मैदानावर हा त्यांचा पहिला कसोटी मालिका पराभव ठरेल. दुसरीकडे, द. आफ्रिकेने हा सामना जिंकल्यास जोहान्सबर्गमध्ये भारताने कसोटी सामन्यात पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

3 / 6
जोहान्सबर्गमध्ये भारताचा हा सहावा कसोटी सामना असेल. भारताने याआधी येथे खेळलेल्या 5 पैकी 2 कसोटी सामने जिंकले आहेत. तर 3 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. जोहान्सबर्गचे आकडे टीम इंडियाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट आहे. तसेच पहिली कसोटी जिंकल्यामुळे टीम इंडिया अधिक आत्मविश्वासाने या सामन्यात खेळेल.

4 / 6
दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये यजमानांचं पारडं टीम इंडियापेक्षा नेहमीच जड राहिलं आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत 21 कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताला केवळ 4 कसोटी जिंकता आल्या आहेत. भारताने यापैकी 10 सामने गमावले आहेत. तर 7 सामने अनिर्णित राहिले आहेत.

5 / 6
विराट कोहली हा अशा कसोटी कर्णधारांपैकी एक आहे जो आपल्या विनिंग टीम कॉम्बिनेशनमध्ये शक्यतो बदल करत नाही. त्यामुळे जोहान्सबर्ग कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रहाणे आणि पुजाराची जागा पक्की आहे. मात्र जहान्सबर्गच्या खेळपट्टीवर उमेश यादवला संधी मिळू शकते, कारण त्याच्याकडे वेग आहे. त्यामुळे त्याला संघात शार्दुल ठाकूरच्या जागी संधी मिळू शकते. वाँडरर्सच्या खेळपट्टीवरील गवत आणि वेग उमेश यादवच्या गोलंदाजीला साजेसा आहे.

6 / 6
दुसऱ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन : केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर. अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर / उमेश यादव.