IND vs SA T20 WC: रोहित शर्माने जिंकला टॉस, अक्षर पटेल ड्रॉप, त्याच्याजागी ‘या’ खेळाडूला संधी

| Updated on: Oct 30, 2022 | 4:13 PM

IND vs SA T20 WC: आजची मॅच दोन्ही टीम्ससाठी महत्त्वाची आहे, कारण....

IND vs SA T20 WC: रोहित शर्माने जिंकला टॉस, अक्षर पटेल ड्रॉप, त्याच्याजागी या खेळाडूला संधी
ind vs sa
Follow us on

पर्थ: टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आज आपला तिसरा सामना खेळणार आहे. सुपर 12 राऊंडमध्ये टीम इंडियाने सलामीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. आधी पाकिस्तान त्यानंतर नेदरलँड्सवर विजय मिळवला. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा सामना आहे. टीम इंडिया ग्रुप 2 मध्ये सध्या टॉपवर आहे. आजची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मॅच जिंकून टीम इंडियाकडे विजयाची हॅट्रिक करण्याची संधी आहे.

आजची मॅच का महत्त्वाची ?

दक्षिण आफ्रिकेची टीम वर्ल्ड कपमध्ये दोन पैकी एक मॅच जिंकली आहे. पहिला झिम्बाब्वे विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. या मॅचचा एक पॉइंट मिळाला. दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी बांग्लादेशवर विजय मिळवला. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने आजची मॅच दोन्ही टीम्ससाठी महत्त्वाची आहे.

कोणी जिंकला टॉस?
दरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकला आहे. त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने एक बदल केला आहे. अक्षर पटेलच्या जागी दीपक हुड्डाचा समावेश केला आहे.

म्हणून दीपक हुड्डाचा टीममध्ये समावेश

दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंग लाइनअपमध्ये क्विंटन डिकॉक, राइली रुसो आणि डेविड मिलर हे तीन आक्रमक डावखुरे फलंदाज आहेत. ते लेफ्टी असल्यामुळे अक्षर पटेलच्या जागी दीपक हुड्डाला संधी दिली आहे. ऑफ स्पिन गोलंदाजीसह लोअर ऑर्डरमध्ये हुड्डा फलंदाजीसाठी चांगला पर्याय आहे.

पर्थची खेळपट्टी कोणाला साथ देणार?

पर्थची खेळपट्टी वेगवान आहे. या खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना साथ मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत, तर भारताकडे चांगले फलंदाज. दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी विरुद्ध भारताची फलंदाजी असा हा सामना असेल.

हवामान विभागाचा अंदाज काय?

ऑस्ट्रेलियन हवामान विभागानुसार, आज दुपारच्या वेळी आणि संध्याकाळ होण्याआधी पाऊस कोसळू शकतो. हवामानाचा परिणाम भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यापेक्षा पाकिस्तान-नेदरलँडस मॅचवर जास्त दिसेल. ज्यावेळी पावासाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, त्याचा भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यावर परिणाम होण्याची शक्यता फार कमी आहे.

टीम इंडियाची प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दीपक हुड्डा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी.