Marathi News Sports Cricket news India vs south africa johannesburg test virat kohli shared net practice session photos will he score a century
IND vs SA: जोहान्सबर्गमध्ये शतकांचा दुष्काळ संपणार? नव्या वर्षाची चांगली सुरुवात करण्यासाठी विराट कोहली सज्ज
भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक चमत्कार घडवण्याच्या जवळ आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून, आता जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाच्या आशेने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.