केपटाऊन: तिसऱ्यादिवस अखेर डीन एल्गरच्या (Dean Elgar) रुपाने भारताला महत्त्वाचा विकेट मिळाला. दिवसातील शेवटच्या चेंडूवर बुमराहने एल्गरला (30) धावांवर ऋषभ पंतकरवी (Rishabh pant) झेलबाद केले. पण आफ्रिका दोन बाद 101 अशी सुस्थितीत आहे. उद्या दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 111 धावांची गरज आहे. सध्या आफ्रिकेचे फलंदाज ज्या पद्धतीची फलंदाजी करतायत, ते पाहून विजयाच पारड त्यांच्या बाजूने झुकलेलं आहे, असंच म्हणाव लागेल. कारण मार्कराम, एल्गर तंबूत परतले असले, तरी पीटरसन, डुसें, बावुमा अजून बाकी आहेत.
या तिघांनी या मालिकेत भारताला सहजासहजी आपली विकेट मिळू दिलेली नाही. 29 वर्षानंतर विराटच्या संघाला दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयाचे स्वप्न साकार करायचे असेल, तर गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये भारतीय संघाला विशेष कमाल करुन दाखवावी लागेल. खरंतर एल्गर आणि पीटरसनने शमी, बुमराह, ठाकूर, उमेश यादव यांच्या तोफखान्यासमोर ज्या पद्धतीची फलंदाजी केली, त्यातून भारतीय फलंदाजांनी बोध घेतला पाहिजे. दोघांनी दुसऱ्याविकेटसाठी जलदगतीने 77 धावांची भागीदारी केली.
आता दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे, असे म्हणता येणार नाही. कारण पारडं आफ्रिकेच्या बाजूने झुकलेलं आहे. दुसऱ्याडावात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन भारताला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. अपवाद फक्त ऋषभ पंतच्या शतकाचा. ऋषभच्या शतकी खेळीमुळे भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य ठेवता आले. विराट आणि ऋषभ आज खेळपट्टीवर उभे राहिले नसते, तर कदाचित आजच दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला असता.
विराटने पंतसोबत पाचव्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. विराटने फक्त 29 धावा केल्या. पण खेळपट्टिवर टिकून राहिला. अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. पुजारा-रहाणे यांनी मोक्याच्याक्षणी विकेट गमावून संघाला आणखी अडचणीत आणलं.
A big wicket at the stroke of Stumps on Day 3.
Bumrah picks up the wicket of Dean Elgar as South Africa are 101/2.
An all important Day 4 awaits.
Scorecard – https://t.co/9V5z8QkLhM #SAvIND pic.twitter.com/XJQwKanywz
— BCCI (@BCCI) January 13, 2022
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणे, ऋद्धिमान साहा, जयंत यादव, प्रियांक पांचाल, उमेश यादव, हनुमा विहारी आणि इशांत शर्मा.
दक्षिण अफ्रीका: डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा, कगिसो रबाडा, सरेल इरवी, ब्युरेन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी निगीडी, एडेन मार्कराम, वियान मुल्डर, कीगन पीटरसन, रासी वान डर डुसे , काइल वेरेने, मार्को यानसन, ग्लेनटन स्टुरमैन, प्रेनेलन सुब्रायेन, सिसांडा मगाला, रेयान रिकेल्टन, डुआने ओलिवियर.