भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील जोहान्सबर्ग कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ अवघ्या 202 धावांवर गारद झाला होता. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचीही पहिल्या डावात चांगली सुरुवात झाली नाही आणि चौथ्या षटकातच संघाने पहिली विकेट गमावली. मात्र, कर्णधार डीन एल्गर आणि कीगन पीटरसन यांनी डाव सांभाळला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोघांनीही एकही विकेट पडू दिली नाही आणि दक्षिण आफ्रिकेने 35 धावा केल्या. भारत अजूनही 167 धावांनी पुढे आहे आणि त्यांना आज दक्षिण आफ्रिकेच्या उर्वरित 9 विकेट मिळवायच्या आहेत.
भारतीय संघ:
केएल राहुल(कर्णधार), हनुमा विहारी, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, आर अश्विन
दक्षिण आफ्रिकेचा संघ:
डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, कीगन पीटरसन, टेंबा बावुमा, रेसी वान डर डुसें, कार्ल वेरेन, कगिसो रबाडा, मार्को जॅनसेन, लुंगी निगीडी, डुआन ओलिवर, केशव महाराज.