जाहोन्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दक्षिण आफ्रिकेने हा सामना सात विकेटने जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा नायक ठरला, त्याचा कर्णधार डीन एल्गर. त्याने 96 धावांची खेळी केली. आतापर्यंतच्या तीन डावांमध्ये भारतीय गोलंदाज प्रभावी ठरले होते. पण चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आपली कामगिरी उंचावली व भारतीय गोलंदाजांना अजितबात दाद दिली नाही.
जोहान्सबर्ग कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा नायक ठरलेल्या डीन एल्गरला सामनावीराच्या पुरस्कारने गौरवण्यात आले. त्याने नाबाद 96 धावांची खेळी केली.
पहिल्या डावात आम्ही 60 ते 70 धावा कमी केल्या. ते आमच्या पराभवाचा एक मुख्य कारण आहे, असं भारताचा कॅप्टन केएल राहुलने सांगितलं.
भारतीय संघ:
केएल राहुल(कर्णधार), हनुमा विहारी, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, आर अश्विन
दक्षिण आफ्रिकेचा संघ:
डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, कीगन पीटरसन, टेंबा बावुमा, रेसी वान डर डुसें, कार्ल वेरेन, कगिसो रबाडा, मार्को जॅनसेन, लुंगी निगीडी, डुआन ओलिवर, केशव महाराज.