मुंबई: जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजीमधून बाहेर गेला आहे. त्याच्याजागी मोहम्मद सिराजला संधी मिळाली आहे. मागच्या 7 महिन्यापासून सिराज या संधीच्या प्रतिक्षेत होता. बीसीसीआयने शुक्रवारी सकाळी सिराजची निवड झाल्याची माहिती दिली. सिराज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उर्वरित दोन टी 20 सामने खेळणार आहे.
सिराजच्या निवडीनंतर आता काही प्रश्न निर्माण झालेत. मोहम्मद शमी टी 20 वर्ल्ड कपसाठी स्टँडबायवर आहे. मग सीरीजमध्ये त्याला संधी का नाही मिळाली? असा प्रश्न विचारला जातोय.
म्हणून सिराजला टीममध्ये निवडलं
7 महिन्यांपासून जो प्लेयर टी 20 टीम बाहेर आहे, त्याला कशी संधी मिळाली. यामागे कारण आहे फॉर्म. मोहम्मद सिराजच्या प्रदर्शनात सातत्य आहे. शमी टीम इंडियासाठी शेवटचा टी 20 सामना मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये खेळला होता. त्यावेळी तो खूपच महागडा ठरलेला. सिराजबद्दल बोलायच झाल्यास, तो पावरप्लेमध्ये उत्तम गोलंदाजी करतो.
पावरप्लेमध्ये गोलंदाजीचे आकडे काय सांगतात?
टी 20 क्रिकेटमध्ये सिराजची इकोनॉमी 8.36 ची आहे. पावरप्लेमध्ये त्याची इकोनॉमी 8.45 आहे. पावरप्लेमध्ये स्फोटक सुरुवात करण्याचा फलंदाजांचा प्रयत्न असतो. त्यावेळी सिराज त्यांना रोखण्यात यशस्वी ठरु शकतो. पावरप्लेमध्ये 60 इनिंग्समध्ये त्याने जवळपास 22 विकेट घेतल्यात.
गाबामध्ये मिळवून दिला होता ऐतिहासिक विजय
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवलं होतं. गाबामध्ये ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात सिराजने महत्त्वाची भूमिका बजावलेली. काऊंटी क्रिकेटमध्ये त्याने धुमाकूळ घातला आहे. याच महिन्यात वॉरविकशायर विरुद्ध त्याने काऊंटी क्रिकेटमध्ये डेब्यु केला. पहिल्याच मॅचमध्ये सॉमरसेट विरुद्ध पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या.
मोहम्मद शमीला कोरोना
झिम्बाब्वे दौऱ्यावर सिराजने 3 वनडे मॅचेसमध्ये एकूण 4 विकेट काढल्या. सिराजने टीम इंडियासाठी 5 टी 20 मॅचमध्ये 5 विकेट काढल्या आहेत. त्याने एकूण 102 टी 20 सामन्यात 117 विकेट घेतल्यात.
मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीज सुरु होण्याआधी कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळत नाहीय. आता तो कोरोनामधून बरा झालाय. त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय.