अहमदाबाद: दुखापतीमुळे सलामीवीर रोहित शर्मा (Rohit sharma) आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला (South Africa test series) मुकणार आहे. त्याला तिन्ही कसोटी सामन्यात खेळता येणार नाहीय. रोहितच्या जागी गुजरातच्या प्रियांक पांचाळची (Priyank Panchal) संघात निवड झाली आहे. प्रियांक नुकताच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतला आहे. प्रियांक भारतीय ‘अ’ (India A) संघाकडून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. सोमवारी सकाळी प्रियांकला भारतीय संघात निवड झाल्याचं समजलं. कसोटी संघात निवड झाल्यामुळे प्रियांक सध्या प्रचंड आनंदात आहे.
मी नशीबवान आहे
“मला फोन आला, तेव्हा मी घरी होतो. मी खूप आनंदी आहे. भारतीय संघाची जर्सी परिधान करणं हे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. मला झालेला आनंद आणि भावना मला व्यक्त करता येत नाहीय. मी नशीबवान आहे. मी हे स्वप्न जगतोय. मी खूप उत्साहित आहे. फलंदाजी असो वा गोलंदाजी प्रत्येक आघाडीवर हा भारतीय संघ मजबूत आहे. आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत. मी खरोखर भाग्यवान आहे. या संघाचा भाग होणं हा एक सन्मान आहे” असं प्रियांक म्हणाला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
दक्षिण आफ्रिकेत फक्त चार धावांनी हुकलं शतक
प्रियांक पांचाळ नुकताच दक्षिण आफ्रिकेतून परतला आहे. त्याला तिथलं वातावरण, खेळपट्टयांची चांगली कल्पना आहे. भारतीय ‘अ’ संघाकडून खेळताना प्रियांकच्या फलंदाजीत सातत्य, एकाग्रता दिसली होती. तशाच पद्धतीचा खेळ त्याला पुन्हा करावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या तीन अनधिकृत कसोटींपैकी त्याने दोन सामन्यात त्याने भारत अ चे नेतृत्व केले. दोन सामन्यात त्याने १२० धावा केल्या. पहिल्या कसोटीत त्याने १७१ चेंडूत ९६ धावा केल्या.
Thank you everyone for all your good wishes. Honoured to be donning the team India jersey. Thank you for showing faith in me @BCCI . Looking forward to the series!
— Priyank Panchal (@PKpanchal9) December 14, 2021
कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज
“नुकताच मी भारतीय अ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर परतलो. संघाचे नेतृत्व करताना एका सामन्यात ९६ धावा केल्या. फक्त चार धावांनी माझे शतक हुकले. पण या दौऱ्याचा अनुभव खूप सुंदर होता” असे प्रियांक म्हणाला. “दक्षिण आफ्रिकेतील वातावरण, खेळपटट्यांची मला कल्पना आहे. मला संधी मिळाली, तर दक्षिण आफ्रिकेत खेळल्याचा निश्चित फायदा होईल. आव्हानांचा विचार केला, तर कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी मी स्वत:ला सज्ज केले आहे कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही स्थानावर खेळण्यासाठी मी तयार आहे. एक क्रिकेटपटू म्हणून संघाला गरज असताना, चांगली कामगिरी करण्यासाठी मला तयार असले पाहिजे” असे प्रियांकने सांगितले. २६ डिसेंबरला बॉक्सिंग डे च्या दिवशी सेंच्युरियनमध्ये सुपरस्पोटर्स पार्क स्टेडियममधुन भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
संबंधित बातम्या: