मुंबई: IPL 2022 चा सीजन संपला आहे. क्रिकेट रसिकांना आता आंतरराष्ट्रीय सीजनचा आनंद घेता येणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) दोन्ही संघ मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. बायोबबलमधून दोन्ही टीम्सच्या खेळाडूंना मुक्ती मिळाली आहे. प्रेक्षकही हे सामने पहाण्यासाठी मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये उपस्थित असतील. एक रोमांचक सामना पहायला मिळावा, अशी क्रिकेट रसिकांची (Cricket Fans) इच्छा आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे सामने कधी, कुठे, कसे पाहता येतील. वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही सामने पाहू शकता. हे सामने कसे पहायचे, त्या बद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघातला हा 16 वा सामना आहे. या आधी खेळल्या गेलेल्या 15 सामन्यात भारताचं पारड जड आहे. भारताने 9 सामने जिंकलेत, तर दक्षिण आफ्रिकेने सहा. दक्षिण आफ्रिकन संघासाठी एक चांगली बाब आहे, ती म्हणजे भारतीय मैदानांवर त्यांची कामगिरी चांगली आहे. भारतात टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ 4 सामने खेळलाय. त्यात 3 सामने त्यांनी जिंकलेत. भारतात टीम इंडियाला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आलाय.
IND vs SA 1st 20: जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकता सामना
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या पहिल्या T 20 सामन्याचं लाइव प्रसारण कुठे होणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी 20 सामन्याचं लाइव प्रसारण Star sports Network वर होणार आहे. चाहते Star sports 1, Star sports1HD, Star sports 3 and Star sports 3 HD या चॅनलवर तुम्ही सामन्याचा आनंद घेऊ शकता.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील 5 T 20 मालिकेतील पहिला सामना कधी खेळला जाणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पाच टी 20 सामन्यातील पहिला सामना 9 जूनला संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. टॉस संध्याकाळी 6.30 वाजता उडवला जाईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला टी 20 सामना कुठे खेळला जाणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला टी 20 सामना नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जाईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या टी 20 सामन्याच लाइव स्ट्रीमिंग कसे पाहता येईल?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या पहिल्या T 20 चे लाइव स्ट्रीमिंग Disney+Hotstar वर पाहता येईल.