मुंबई: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आजपासून 3 T20 सामन्यांची मालिका सुरु होत आहे. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर आज पहिली मॅच होत आहे. पुढच्या महिन्यापासून ऑस्ट्रेलियात T20 वर्ल्ड कप सुरु होणार आहे. त्याआधी तयारीच्या दृष्टीने दोन्ही टीम्ससाठी ही सीरीज महत्त्वाची आहे. मागच्याच आठवड्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सीरीज संपली. या मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने विजय मिळवला होता.
टॉस कुणी जिंकला?
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकला आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दक्षिण आफ्रिकेची टीम प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. या मॅचसाठी युजवेंद्र चहलला बाहेर बसवण्यात आलं आहे. त्याच्याजागी रविचंद्रन अश्विनला संधी दिली आहे. जसप्रीत बुमराहला सुद्धा आजच्या सामन्यासाठी संधी दिलेली नाही. त्याजागी दीपक चाहरचा टीममध्ये समावेश केला.
चुका सुधारण्याची संधी
आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरीज जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. टीम इंडियासमोर अजूनही काही प्रश्न आहेत. खासकरुन गोलंदाजी. आशिया कपमध्ये गोलंदाजीमुळे टीम इंडियाच्या अभियानाला ब्रेक लागला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीजमध्येही गोलंदाजीत फार सुधारणा झाली नाही.
उलट डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी चिंतेचा विषय आहे. भुवनेश्वर कुमार सारख्या सिनियर बॉलरकडून भरपूर अपेक्षा आहेत. पण याच गोलंदाजाने अखेरच्या ओव्हर्समध्ये सर्वात जास्त धावा दिल्या.
1ST T20I. India XI: R Sharma (c), K L Rahul, V Kohli, S Yadav, R Pant (wk), D Karthik, A Patel, H Patel, R Ashwin, D Chahar, A Singh. https://t.co/yQLIMooZxF #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) September 28, 2022
गोलंदाजी आणि फिल्डिंग मुख्य चिंतेचा विषय आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये या चुका दुरुस्त करण्याची चांगली संधी आहे. टीम इंडियाला अजूनपर्यंत मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीज जिंकता आलेली नाही. यावेळी हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न असेल.
आजच्या सामन्यासाठी अशी आहे प्लेइंग 11
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, रविचंद्रन अश्विन, दीपक चाहर, अर्शदीप सिंह,