IND vs SA: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात कोणते बदल होणार? रहाणे-पुजाराच्या जागी अय्यर-विहारीला संधी?

| Updated on: Jan 02, 2022 | 10:58 AM

भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये जोहान्सबर्गमध्ये खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हे प्रश्न निर्माण झाले आहेत कारण सेंच्युरियन आणि वाँडरर्सच्या खेळपट्ट्यांमध्ये बराच फरक आहे.

IND vs SA: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात कोणते बदल होणार? रहाणे-पुजाराच्या जागी अय्यर-विहारीला संधी?
अजिंक्य रहाणे - चेतेश्वर पुजारा
Follow us on

जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये जोहान्सबर्गमध्ये खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हे प्रश्न निर्माण झाले आहेत कारण सेंच्युरियन आणि वाँडरर्सच्या खेळपट्ट्यांमध्ये बराच फरक आहे. तसेच दुसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणे आणि पुजाराच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याबाबतचा सर्वात मोठा प्रश्न आहे. या दोघांच्या जागी श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारीला संधी मिळेल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सेंच्युरियनमधली परिस्थिती पाहता अय्यर आणि विहारी यांना संधी मिळायला हवी. पण, जोहान्सबर्गमधील पुजारा-रहाणे यांची कामगिरी आणि त्यानंतर कर्णधार कोहलीचा मूड पाहता त्यांना संघातून वगळलं जाण्याची शक्यता कमी आहे. यापैकी कोणी दुखापतग्रस्त झालं तर त्या खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमधून वगळलं जाऊ शकतं. याचा अर्थ, अय्यर आणि विहारी यांना संधीची अजून वाट पहावी लागेल. (India vs South Africa : Team India Playing XI for Johannesburg test, Can management replace Rahane-Pujara for Iyer-Vihari)

विराट कोहली हा अशा कसोटी कर्णधारांपैकी एक आहे जो आपल्या विनिंग टीम कॉम्बिनेशनमध्ये शक्यतो बदल करत नाही. आता या धर्तीवर विचार केला तर प्लेइंग इलेव्हनमध्ये रहाणे आणि पुजाराची जागा पक्की झाली आहे. सेंच्युरियन कसोटीच्या दोन्ही डावात पुजाराने केवळ 16 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, रहाणेला सेंच्युरियनमध्ये संधी मिळणे हा त्याच्यावर संघ व्यवस्थापनाचा विश्वास अजूनही कायम असल्याचा पुरावा आहे. त्याने पहिल्या डावात 48 आणि दुसऱ्या डावात 20 धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांचा अलीकडचा रेकॉर्ड खराब राहिला आहे. पण, सध्याच्या टीम इंडियामध्ये वाँडरर्सच्या मैदानावर विराटनंतर पुजारा हा दुसरा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. दुसरीकडे, वाँडरर्सच्या खेळपट्टीवर गवत आणि बाऊन्स दोन्ही असणे अपेक्षित आहे, ज्याचा सामना करण्याचा रहाणेकडे जुना अनुभव आहे.

गोलंदाजीत बदल

एक गोष्ट स्पष्ट आहे की दुखापतीशिवाय दुसऱ्या कसोटीसाठी फलंदाजीच्या क्रमात कोणताही बदल होणार नाही. पण बॉलिंग कॉम्बिनेशनबद्दल बोलायचे झाल्यास त्यात बदल होऊ शकतो. जहान्सबर्गच्या खेळपट्टीवर उमेश यादवला संधी मिळू शकते, कारण त्याच्याकडे वेग आहे. त्यामुळे त्याला संघात शार्दुल ठाकूरच्या जागी संधी मिळू शकते. वाँडरर्सच्या खेळपट्टीवरील गवत आणि वेग उमेश यादवच्या गोलंदाजीला साजेसा आहे.

इतर बातम्या

माझ्या कहानीत खूप सारे व्हिलन, आता हरभजनसिंगच्याही टार्गेटवर बीसीसीआय, धोनीबद्दलही नाराजी?

कोहलीचे दिवस फिरलेलेच ! क्रिकेटच्या देवानेही त्याला बेस्ट टीममधून वगळलं, धोनीचं काय झालं?

Explained: परदेशात भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमागे ‘ही’ प्रमुख तीन कारणं

(India vs South Africa : Team India Playing XI for Johannesburg test, Can management replace Rahane-Pujara for Iyer-Vihari)