IND vs SA: आपल्या कामगिरीने लोकांची तोंड बंद करा, झहीरचा अजिंक्य रहाणेला सल्ला

| Updated on: Dec 25, 2021 | 5:43 PM

पुजाराने कसोटीमध्ये 1087 दिवस तर रहाणेने 363 दिवसांपासून एकही शतक झळकावलेले नाही. पुजाराने सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलिया विरोधात 2019 मध्ये शेवटचे शतक झळकावले होते.

IND vs SA: आपल्या कामगिरीने लोकांची तोंड बंद करा, झहीरचा अजिंक्य रहाणेला सल्ला
चेतेश्वर पुजाराची स्थिती काही वेगळी नाही. यावर्षी त्याची सरासरी धावसंख्या 30.42 आहे, तर 2020 मध्ये ती 20.37 होती. त्याला कसोटी शतक झळकावून बराच काळ लोटला आहे. मात्र, घरच्या खेळपट्ट्यांवर चेतेश्वर पुजाराची सरासरी 55.33 आहे. अशा परिस्थितीत त्याची जागा वाचू शकते. पुजाराला सलामीला उतरवण्याचा निर्णयदेखील संघ व्यवस्थापन घेऊ शकतं. पुजाराने यापूर्वीही हे केले आहे. सलामीवीर म्हणून सहा डावात त्याने 116 च्या सरासरीने धावा केल्या आहेत आणि केवळ तीन वेळा तो बाद झाला आहे.
Follow us on

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये उद्यापासून तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या दौऱ्यात प्रथमच मालिका विजय मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष असेल. मागच्या काही मालिकांमध्ये त्यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका सुरु आहे. कसोटीआधी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने रहाणे आणि पुजाराला आपल्या कामगिरीने लोकांची तोंड बंद करण्याचा सल्ला दिला आहे.

पुजाराने कसोटीमध्ये 1087 दिवस तर रहाणेने 363 दिवसांपासून एकही शतक झळकावलेले नाही. पुजाराने सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलिया विरोधात 2019 मध्ये शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर त्याने 11 अर्धशतक झळकावली. एकदा नर्वस नाईटीजमध्येही बाद झाला आहे. अजिंक्य रहाणेने सुद्धा शेवटचे शतक ऑस्ट्रेलिया विरुद्ध झळकावले होते. मेलबर्नमध्ये मागच्यावर्षी 26 डिसेंबरला 112 धावांची त्याने खेळी केली होती. त्यानंतर 12 कसोटी सामन्यांमध्ये रहाणेने फक्त दोन अर्धशतक झळकावली आहेत.

अजिंक्य रहाणेबद्दल झहीर खान म्हणाला….
“अजिंक्य रहाणे दबावाखाली आहे. कुठल्याही क्रिकेटपटूला या स्थितीमधून बाहेर पडण्यासाठी मानसिक मजबुती आवश्यक असते. कुठलाही क्रिकेटपटू खराब फॉर्ममध्ये असेल, तर तो चांगल्या कामगिरीपासून फक्त एक डाव दूर आहे, असा विश्वास असला पाहिजे. तुम्ही एकाडावात शानदार प्रदर्शन केलं तर गोष्टी वेगाने बदलतात. एक क्रिकेटपटू म्हणून ही आव्हानं स्वीकारुन त्यांचा सामना केला पाहिजे, असाच सल्ला मी अजिंक्यला देईन” असे झहीर खानने सांगितले.