मुंबई: टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध पहिला T20 सामना 2 रन्सनी जिंकला. दीपक हुड्डा, अक्षर पटेलचा आणि इशान किशनचा अपवाद वगळता अन्य भारतीय फलंदाज फार चमक दाखवू शकले नाहीत. कालच्या मॅचमध्ये गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी श्रीलंकन फलंदाजांना क्रीजवर टीकू दिलं नाही. फिल्डिंग सुद्धा कमालीची होती. इशान किशनने या मॅचमध्ये पकडलेल्या एका कॅचची सर्वत्र चर्चा आहे. चित्त्याच्या चपळाईने मागे पळत जाऊन इशानने ही कॅच पकडली. 8 व्या ओव्हरमध्ये हा झेल घेतला. उमरान मलिकच्या चेंडूवर चरिथ असालंकाने पुल फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागला.
इशानची नजर फक्त चेंडूवर
चेंडू फाइन लेगच्या दिशेला हवेत गेला. हर्षल पटेल कॅच घेण्यासासाठी डीपवरुन धावत येत होता. पण इशान किशनची नजर चेंडूवर होती. त्याची नजर वर चेंडूकडे होती. त्याने हर्षलला थांबण्याचा इशारा केला व चित्त्याच्या चपळाईने हवेत झेपावून झेल पकडला. कॅप्टन हार्दिक पंड्याला सुद्धा ही कॅच पाहून आश्चर्य वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं.
— IPLT20 Fan (@FanIplt20) January 3, 2023
इशानला सलाम
इशान किशनच्या कॅचमुळे असालंकाचा डाव 12 धावांवर आटोपला. इशानच्या या कॅचच सर्वत्र कौतुक होतय. माजी ऑलराऊंडर इरफान पठानने सुद्धा टि्वट केलय. अलीकडच्या काही दिवसात कुठल्या विकेटकीपरने पकडलेली ही सर्वोत्तम कॅच आहे.
इशानने बॅटनेही कमाल केली
विकेटच्यापाठी इशानने कमाल केलीच. पण बॅटने सुद्धा त्याने चांगल्या धावा केल्या. दीपक हुड्डानंतर य़ा सामन्यात सर्वाधिक धावा इशानने केल्या. त्याने 37 धावा केल्या. त्याने 29 चेंडूत या धावा फटकावताना 3 चौकार आणि 2 षटकार लगावले. हुड्डाने नाबाद 41 धावा केल्या. अक्षर पटेल नाबाद 31 धावांची इनिंग खेळला. या तिघांशिवाय कॅप्टन हार्दिक पंड्याने 29 रन्सच योगदान दिलं. त्याशिवाय अन्य भारतीय फलंदाज फार चालले नाहीत. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन फ्लॉप ठरले.