India vs Sri Lanka, 2nd ODI: भारत आणि श्रीलंकेमध्ये आज ईडन गार्डन्सवर दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. भारताने 67 रन्सनी पहिला सामना जिंकला होता. पहिल्या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिलने चांगल्या धावा केल्या होत्या. कोहलीने या मॅचमध्ये आपलं 73 व आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं. गुरुवारी सुद्धा भारताची नजर सीरीज विजयावर असेल. कोहलीकडे शतकांची शानदार हॅट्रिक करण्याची संधी असेल.
टॉस कोणी जिंकला?
श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाकाने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला पहिली बॅटिंग करण्याची संधी दिली होती. भारताने धावांचा डोंगर उभारला होता. श्रीलंकेला दुसऱ्या डावात टार्गेटचा पाठलाग करणं जमलं नाही.
2ND ODI. India XI: R Sharma (c), S Gill, V Kohli, KL Rahul (wk), S Iyer, H Pandya, A Patel, U Malik, K Yadav, M Shami, M Siraj. https://t.co/MY3Wc5253b #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 12, 2023
रोहित शर्मासाठी खास मैदान
इडन गार्डन्स रोहित शर्माच पसंतीच मैदान आहे. आठ वर्षापूर्वी त्याने या मैदानावर डबल सेंच्युरी ठोकली होती. जानेवारी 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटच वनडे शतक झळकवल होतं.
अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक,
श्रीलंकेची प्लेइंग 11
कुसल मेंडिस, अविष्का फर्नांडो, चारित असलांका, धनंजय डी सिल्वा, नुवानिदु फर्नांडो, दुसान शनाका (कॅप्टन), वानिंदु हसरंगा, चामिका करुणारत्ने, दुनिथ वेलेज, लाहिरू कुमारा, कसुन रजिता