कोलंबो : भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यावर कोरोनाचे संकट कोसळले असून भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला (Krunal Pandya) कोरोनाची बाधा झाल्यामुळे दुसरा टी-20 सामना एकदिवस पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे 27 जुलैचा सामना आज म्हणजेच 28 जुलैला होणार आहे. दरम्यान कृणाल शिवाय इतर खेळाडू कोरोना निगेटिव्ह आले असले तरी त्याच्या निकट संपर्कात आलेले 7 खेळाडू सुरक्षेचा उपाय म्हणून विलगीकरणात आहेत. यामध्ये हार्दिक पांड्या, इशान किशन, कृष्णप्पा गौतम, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल आणि दीपक चहार यांचा समावेश आहे. या सर्वांच्या जागी इतर राखीव खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे.
एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-1 च्या फरकाने उत्कृष्ट विजय मिळवला. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारताला तिसऱ्या सामन्यात मात्र पराभव पत्करावा लागला होता. आता या दौऱ्यातील दुसरा टप्पा म्हणजे तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. ज्यातील पहिला सामना भारताने जिंकला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून भारत मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर श्रीलंका पहिला विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना बुधवारी, 28 जुलै रोजी कोलंबोच्या आर. प्रेमादासा मैदानावर खेळवला जाईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल.
भारत आणि श्रीलंका संघ यांच्यातील दुसरा टी-20 सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील या सामन्याचं Live Streaming SONY LIVE वर असेल.
इतर बातम्या
अष्टपैलू हार्दीक पंड्या होऊ शकतो संघाबाहेर, ‘या’ दोन गोलंदाजांमुळे संघातील स्थानाला धोका
(India vs Sri Lanka 2nd T20 Live Streaming when and where to Watch online free in Marathi)