बंगळुरु: भारत आणि श्रीलंकेत मालिकेतील दुसरा कसोटी सामना बंगळुरुमध्ये सुरु आहे. पहिल्यादिवस अखेरीस भारत मजबूत स्थितीमध्ये होता. गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर भारताचा पहिला डाव 252 धावात संपुष्टात आला. भारतीय गोलंदाजांनी सुद्धा जोरदार पलटवार केला. अखेरच्या सत्रात श्रीलंकेची सहा बाद 286 अशी अवस्था झाली होती. टीमकडून श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सर्वाधिक 92 आणि विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) 39 धावा केल्या. कॅप्टन आणि सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यात विशेष काही करु शकला नाही. त्याने 25 चेंडूत केवळ 15 धावा केल्या. रोहितच्या 15 धावांपैकी 10 धावा फक्त षटकार आणि चौकारामधून निघाल्या. रोहितने त्याच्या छोट्याशा खेळीत एक षटकार आणि एक चौकार लगावला.
रोहितने फक्त एक षटकार मारला. पण स्टेडिमममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या चहात्याला तो भलताच महाग पडला. त्या षटकाराने चाहता रक्तबंबाळ झाला. रोहितने मारलेला षटकार नाकावर आदळला. रुग्णालयात गेल्यानंतर नाकाचं हाड मोडल्याचं समजलं. रोहितला याबद्दल काहीच माहित नव्हतं.
फॅनच्या नाकाला टाके घालावे लागले
चिन्नास्वामी स्टेडियम दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी खच्चून भरलं होतं. चाहत्यांना आपल्या स्टार खेळाडूंना खेळताना पहायचं होतं. रोहित मयंक अग्रवालसोबत सलामीला आला होता. विश्वा फर्नांडो सहावं षटक टाकत होता. षटकातील शेवटच्या चेंडूवर रोहितने पुलचा फटका खेळून मिडविकेटला षटकार ठोकला. रोहितचा हा षटकार कॉर्पोरेट बॉक्समध्ये बसलेल्या चाहत्याच्या नाकावर आदळला. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे एक्स-रे काढल्यानंतर नाक फ्रॅक्चर झाल्याचं समजलं. नॅसल बोन फ्रॅक्चर झाल्याचं एक्सरे मध्ये दिसत आहे. नाकाला टाके घालावे लागले.
श्रेयसची जबरदस्त फलंजदाजी
फलंदाजांना त्रासदायक असलेल्या खेळपट्टीवर श्रेयस अय्यरने अर्धशतक फटकावलं. त्याच्या 92 धावांच्या खेळीच्या बळावर भारताने 252 धावा केल्या. श्रेयसने 98 चेंडूत 10 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 92 धावा केल्या. त्याने शेवटच्या तीन फलंदाजांसोबत मिळून 69 धावा जोडल्या. ऋषभ पंतने 39 आणि हनुमा विहारीने 31 धावा केल्या.