कोलंबो : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात आज तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना कोलंबोच्या (Colombo) के प्रेमदासा मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होणार आहे. पहिले दोन सामने जिंकून भारताने मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात उतरताना संघ नवे बदल करुन नवख्या खेळाडूंना संधी देण्याची शक्यता अधिक आहे.
ज्या खेळाडूंना पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात संधी मिळाली नाही त्यांना आज संधी मिळू शकते. यामुळे संघाला दोन फायदे होऊ शकतात. एकतर पहिले दोन सामने तंबूत बसलेल्या खेळाडूंचा सराव होईल आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अंतिम 11 निवडताना संघ व्यवस्थापनालाही फायदा होईल. भारताने मालिका आधीच जिंकली असल्याने अशाप्रकारचे प्रयोग भारतीय संघ करु शकतो.
भारतीय संघ सर्वात पहिला बदल कर्णधार शिखर धवनला विश्रांती देऊन आणि त्याच्याजागी दुसरा सलामीवीर संघात सामिल करुन करु शकतो. शिखर धवनच्या जागी उपकर्णधार भुवनेश्वर कुमारला कर्णधार पद दिले जाऊ शकते. तसेच शिखर सोबत सलामीवीर पृथ्वी शॉलाही आराम देऊन देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड या नवख्या जोडीला सलामीला पाठवू शकतात. यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आता दुखापतीतून सावरला असल्याने इशान किशनच्या जागी त्याला संधी मिळू शकते. तर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या वरिष्ठांना विश्रांती देऊन वरूण चक्रवर्ती आणि राहुल चहरला संघात स्थान दिले जाऊ शकते.
भुवनेश्वर कुमार (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, संजू सॅमसन, दीपक चहर, राहुल चहर, वरूण चक्रवर्ती
हे ही वाचा :
India vs Sri Lanka, 3rd ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
IND vs SL : ‘या’ कारणामुळे राहुल द्रविडने दीपकला लवकर फलंदाजीसाठी पाठवलं, भुवनेश्वरने केला खुलासा
(India vs Sri lanka 3rd ODI team India will come on field with 5 changes in playing xi)