मुंबई: आशिया कपच्या ग्रुप स्टेज मध्ये पाकिस्तानला हरवून भारताने दमदार सुरुवात केली होती. पण सुपर 4 मध्ये त्यांना तशी सुरुवात करता आली नाही. काल झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर पाच विकेट राखून विजय मिळवला. या पराभवामुळे भारताचा फायनलचा मार्ग थोडा कठीण झालाय. रोहित शर्माच्या टीमला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी आता पुढचे दोन सामने जिंकावेच लागतील. टीम इंडियाचे पुढचे दोन सामने श्रीलंका आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहेत.
भारत आणि श्रीलंकेमध्ये 6 सप्टेंबरला सामना खेळला जाईल. श्रीलंकेचा संघ ग्रुप बी मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला होता. पण त्यानंतर सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात त्यांनी अफगाणिस्तानला हरवलं. आता सुपर 4 ग्रुप मध्ये 2 पॉइंटसह ते टॉपवर आहेत. पाकिस्तानही 2 पॉइंटसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारत तिसऱ्या आणि अफगाणिस्तान चौथ्या स्थानावर आहे.
भारत आणि श्रीलंकेत आशिया कप 2022 चा सामना कधी खेळला जाणार?
भारत आणि श्रीलंकेत आशिया कप 2022 चा सामना रविवारी 4 सप्टेंबरला खेळला जाईल.
भारत-श्रीलंकेत आशिया कप 2022 चा सामना कुठे होणार?
भारत आणि श्रीलंकेमध्ये आशिया कप 2022 चा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये खेळला जाईल.
भारत आणि श्रीलंकेत आशिया कप 2022 चा सामना कधी सुरु होणार?
भारत आणि श्रीलंकेत आशिया कप 2022 चा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. संध्याकाळी 7 वाजता टॉस उडवला जाईल.
भारत-श्रीलंकेत आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट कुठे होणार?
भारत आणि श्रीलंके आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनलवर होईल.
भारत आणि श्रीलंका आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होईल?
भारत आणि श्रीलंकामधील आशिया कप 2022 सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग डिजनी हॉटस्टार वर होईल. या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स तुम्ही TV9marathi.com वाचू शकता.