मुंबई : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेला (India vs Sri Lanka) सात विकेट्स आणि 80 चेंडू राखून लोळवलं. सलामीवीर शिखर धवन-पृथ्वी शॉ आणि तिसर्या क्रमांकावर खेळायला आलेल्या ईशान किशनने (Ishan Kishan) सुंदर खेळी करत पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. या तिघांनीही सामन्यात अतिशय उत्तम बॅटिंग केली. सलामीवीरांनी विजयाचा पाया रचून दिल्यानंतर ईशान किशनने मैदानात पाऊल ठेवताच पहिल्या चेंडूवर दणदणीत षटकार ठोकला. विशेष म्हणजे त्याचा हा पदार्पणाचा सामना होता आणि भरीस भर म्हणजे वाढदिनी त्याने पदार्पणाच्या सामन्यात षटकार ठोकण्याचा मान मिळवला. पदार्पणाच्या सामन्यातच ठोकलेल्या षटकारापाठीमागचं गुपित ईशान किशनने चहलला दिलेल्या मुलाखतीतून उलगडून दाखवलं.
ईशान किशनने श्रीलंकेविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारुन कारकीर्दीला दिमाखात सुरुवात केली. ईशान किशनने श्रीलंकेचा गोलंदाज धनंजया डी सिल्वाला षटकार मारत एकदिवसीय क्रिकेटचा श्रीगणेशा केला. किशनने अवघ्या 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करून सर्वांच्या नजरा आपल्याकडे खेचल्या.
सामना संपल्यानंतर ईशान किशनने फिरकीपटू युजवेंद्र चहलला एक खास मुलाखत दिली. या मुलाखतीत पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याची कहाणी त्यांने उलगडून दाखवली. तो म्हणाला, “कुणीही असो, मी ठरवूनच आलो होतो की पहिल्या बॉलवर षटकार मारायचा… मी माझ्या संघातील सहकाऱ्यांना देखील मी पहिला बॉलवर षटकार मारणार असं सांगितलं होतं… त्याच इराद्याने मी पहिल्याच बॉलवर षटकार मारला….”
Ishan Kishan hit his first ball in ODIs for a six. What a start to his ODI career. Earlier this year, Suryakumar Yadav hit his first ball in T20Is for a six #SLvIND pic.twitter.com/YOu0ud49mT
— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) July 18, 2021
“50 षटकांच्या विकेटकीपिंगनंतर मला हे समजलं की विकेट गोलंदाजांना जास्त मदत करणार नाही… गोलंदाज कुणीही असो आणि चेंडू कसाही असो, पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकतो, असं मी संघातील सहकाऱ्यांना सांगून आलो होतो. ठरल्याप्रमाणे मी षटकार मारला. आनंद वाटला… माझा वाढदिवस होता, मी पदार्पण करीत होतो.. भारताने मॅच जिंकली.. भारतासाठी खेळणं खूपच आनंदाची गोष्ट आहे. माझं स्वप्न पूर्ण झालं…”, अशा भावना ईशान किशनने बोलून दाखवल्या.
My dream turning into reality and there is no better feeling. Wearing the India blue is such an honor. Thank you everyone for your wishes and support. The goal remains to continue the hard work, giving it my all for my country ???? pic.twitter.com/YzjWtSjnT2
— Ishan Kishan (@ishankishan51) July 18, 2021
(india vs Sri lanka ishan Kishan game start with Six R Premdasa Stadium Colombo)
हे ही वाचा :
पृथ्वीचा लंकेला तडाखा, धमाकेदार खेळीनंतर सेहवागचं ‘ते’ ट्विट व्हायरल, रवी शास्त्रींची घेतली मजा!
पृथ्वीचा लंकेला तडाखा, धमाकेदार खेळीनंतर सेहवागचं ‘ते’ ट्विट व्हायरल, रवी शास्त्रींची घेतली मजा!