India vs Srilanka : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Srilanka) यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 262 घावांचे लक्ष्य दिले होते. भारताच्या फलंदाजांनी हे लक्ष्य 7 गडी आणि 80 चेंडू राखून पूर्ण केले. कर्णधार शिखर धवन (86) आणि इशान किशनच्या (59) अर्धशतकांच्या जोरावर भारताने हे आव्हान पूर्ण केले. तसेच सलामीवीर पृथ्वी शॉ याने 24 चेंडूत 43 धावांची खेळी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. तर शेवटी सूर्यकुमार यादवने 20 चेंडूत 31 धावा करत भारताला विजय लक्ष्य साध्य करुन देण्यात स्वतःचं योगदान दिलं. (India vs Sri Lanka Live Score 1st ODI match Scorecard in marathi R premdasa Stadium Colombo)
कोलंबोच्या मैदानात सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने तीन फिरकीपटूंना संधी दिली. यामध्ये बऱ्याच काळानंतर भारताची ‘कुल्चा’ अर्थात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांची जोडी मैदानात अवतरली आहे. भारतीय संघाचा तीन फिरकीपटू खेळवण्याचा प्लॅन यशस्वी होताना दिसला. कारण सामन्यात पहिले महत्त्वाचे चार विकेट्स फिरकीपटूनीच घेतले आहेत. दरम्यान संपूर्ण सामन्याचा विचार करता चहल, कुलदीप यादव आणि दिपक चहरने प्रत्येकी दोन विकेट घेतले. तर हार्दीक आणि कृणाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
श्रीलंकेचे गोलंदाज भारतीय फलंदाजांसमोर सपशेल अपयशी ठरल्याचे आजच्या सामन्यात पाहायला मिळाले. सलामीवीर पृथ्वी शॉ (9 चौकारांच्या सहाय्याने 43 धावा) आणि इशान किशन (8 चौकार आणि 2 षटकारांसह 59 धावा) या दोघांनी लंकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दुसऱ्या बाजूला कर्णधार शिखर धवनने संयमी 86 धावांची खेळी करत भारताला पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून दिला.
कर्णधार धवनची (86) संयमी खेळी, पृथ्वी शॉ (43) आणि इशन किशनची (59) फटकेबाजीच्या जोरावर भारताने श्रलंकेच्या संघाने दिलेलं 263 धावांचं आव्हान 7 गडी आणि 80 चेंडू राखून पार केलं आहे.
भारताला तिसरा झटका, मनिष पांडे 26 धावांवर बाद
शिखर धवनची अर्धशतकी खेळी, 63 चेंडूत 50 धावा पूर्ण
भारताने दुसरी विकेट गमावली आहे. धडाकेबाज फलंदाज इशान किशन 59 धावांवर बाद झाला. किशानने 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 42 चेंडूत 59 धावांची खेळी केली. (भारत 146/2)
15 व्या षटकात सलग दोन चौकार लगावत इशान किशनने पहिलं एकदिवसीय अर्धशतक झळकावलं आहे. किशनने 33 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावलं.
कर्णधार शिखर धवन (17) आणि इशान किशन (40) या दोघांनी फटकेबाजी करत अवघ्या 12.2 षटकात धावफलकावर भारताचं शतक झळकावलं आहे. 13 षटकात भारताने 1 बाद 109 धावांपर्यंत मजल मारली आहे.
सलामीवीर पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या इशान किशनने आक्रमक सुरुवात केली आहे. किशनने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत आपल्या एकदिवसीय करिअरची दिमाखात सुरुवात केली आहे. त्यापुढच्या चेंडूवर त्याने चौकार वसूल केला. (भारत 68/1)
भारताने पहिली विकेट गमावली आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ 24 चेंडूत 43 धावांवर बाद झाल आहे. (भारत 58/1)
पहिल्या षटकापासून भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉने श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई सुरु केली आहे. 9 चौकारांच्या सहाय्याने पृथ्वीने 23 चेंडूत 43 धावा फटकावल्या आहेत. (भारत 5 षटकात 57 धावा)
धमाकेदार सुरुवात केल्यानंतर सलामीवीर पृथ्वी शॉने चौथ्या षटकात इसुरुच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. या षटकात पृथ्वीने सलग तीन चौकार फटकावले. (भारत षटकात 45 धावा)
सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजानी सामन्यावर पकड मिळवली होती. मात्र अखेरच्या दोन ओव्हरमध्ये ही पक़ड काहीशी सैल झाली आणि श्रीलंकन खेळाडूंनी त्याचा फायदा घेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. 49 व्या ओव्हरमध्ये चमीरा याने हार्दिकला 13 धावा ठोकल्या तर 50 व्या ओव्हरमध्ये चमिकाने 2 षटकार आणि 1 चौकार ठोकत भुवनेश्वरच्या ओव्हरला 19 रन चोपले ज्यामुळे श्रीलंका संघाने शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 32 रन मिळवले. ज्यामुळे 50 ओव्हरनंतर त्यांचा स्कोर 262 वर 8 बाद इतका झाला.
INNINGS BREAK: Sri Lanka post 262/9 on the board in the first #SLvIND ODI.
2⃣ wickets each for @deepak_chahar9, @imkuldeep18 & @yuzi_chahal
1⃣ wicket each for @krunalpandya24 & @hardikpandya7 #TeamIndia‘s chase shall commence soon.Scorecard ? https://t.co/rf0sHqdzSK pic.twitter.com/RUK3cTL6ht
— BCCI (@BCCI) July 18, 2021
बऱ्याच वेळापासून विकेटची प्रतिक्षा करणाऱ्या हार्दीकला अखेर यश मिळालं असून त्याने श्रीलंकेच्या उडानाला बाद करत भारताला आणखी एक य़श मिळवून दिलं आहे. 47 ओव्हरनंतर श्रीलंकेची हालत 223 वर 8 बाद झाली आहे.
1st ODI. 46.5: WICKET! I Udana (8) is out, c Deepak Chahar b Hardik Pandya, 222/8 https://t.co/rf0sHqvbhk #SLvIND
— BCCI (@BCCI) July 18, 2021
एका मागोमाग एक गडी बाद होत असताना श्रीलंका संघाचा डाव सावरणारा कर्णधार धनुष शनाका ही 39 धावांवर बाद झाला आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या चेंडूवर हार्दीकने शनाकाचा झेल पकडला आहे. शनाकाच्या बाद होण्यानंतर श्रीलंका संघ 205 वर 7 बाद स्थितीत पोहोचला आहे.
1st ODI. 43.5: WICKET! D Shanaka (39) is out, c Hardik Pandya b Yuzvendra Chahal, 205/7 https://t.co/rf0sHqvbhk #SLvIND
— BCCI (@BCCI) July 18, 2021
गोलंदाज दिपक चहरने40 व्यो ओव्हरमध्ये हसनरंगा याला बाद करत संघाचा सहावा आणि स्वत:चा दुसरा विकेट मिळवला आहे. 40 ओव्हरनंतर श्रीलंका 186 वर 6 बाद अशी झाली आहे.
1st ODI. 39.3: WICKET! W Hasaranga (8) is out, c Shikhar Dhawan b Deepak Chahar, 186/6 https://t.co/rf0sHqdzSK #SLvIND
— BCCI (@BCCI) July 18, 2021
बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन झालेल्या भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवने कमालची गोलंदाजी केली आहे. एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट पटकावत कुलदीपने भारताला दोन महत्त्वाच्या विकेट मिळवून दिल्या आहेत. त्याच्या या गोलंदाजीवर माजी क्रिकेटपटू इरफान पठाण खुश झाला असून त्याने ट्विट करत आपला आनंद जाहीर केला आहे.
Happiness is seeing @imkuldeep18 getting wickets. #wickettaker
— Irfan Pathan (@IrfanPathan) July 18, 2021
कृणाल पांड्याला सामन्यातील पहिलं यश मिळालं आहे. धनजंया डी सिल्वाला बाद करत कृणालने भारताला चौथी विकेट मिळवून दिली आहे. 26 ओव्हरनंतर श्रीलंकेची हालत 120 रनवर 4 बाद झाली आहे.
1st ODI. 24.4: WICKET! D de Silva (14) is out, c Bhuvneshwar Kumar b Krunal Pandya, 117/4 https://t.co/rf0sHqvbhk #SLvIND
— BCCI (@BCCI) July 18, 2021
भारताचा अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादवने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतले आहेत. श्रीलंका संघाकडून एक चांगली भागिदारी करत असलेल्या भानुका आणि मिनोद या दोघांना कुलदीपने बाद केलं आहे. भानुकाचा झेल शिखरने तर मिनोदचा झेल स्लीपमध्ये पृथ्वी शॉने पकडला
1st ODI. 16.4: WICKET! M Bhanuka (27) is out, c Prithvi Shaw b Kuldeep Yadav, 89/3 https://t.co/rf0sHqvbhk #SLvIND
— BCCI (@BCCI) July 18, 2021
सामन्यातील पहिल्या 15 ओव्हर्स झाल्या आहेत. श्रीलंकन संघाने दमदार सुरुवात करत 82 धावा स्कोरबोर्डवर लावत केवळ एकच विकेट गमावला आहेे.
युझवेंद्र चहलने पहिली विकेट मिळवल्यानंतर दुसऱ्या एंडवरुन फिरकीपटू कुलदीप यादवने गोलंदाजीला सुरुवात केली आहे. दोन्ही खेळाडू बऱ्याच काळानंतर एकत्र सामना खेळत आहेत.
भारताचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहलने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेच्या अविष्का फर्नांडोला बाद केलं आहे. चहलच्या चेंडूवर मनिष पांडेने कॅच पकडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं आहे.
भारताचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू हार्दीक मागील बऱ्याच काळापासून दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. त्याआधी गोलंदाजी करण्यापासून त्याने विश्रांती घेतली होती. मात्र आता श्रीलंका सामन्याविरोधात त्याने संघात पुनरागमन करत गोलंदाजीलाही सुरुवात केली आहे.
श्रीलंका संघाने फलंदाजी सुरु केली आहे भारताकडून उपकर्णधार भुवनेश्वर कुमार आणि दिपक चहारने गोलंदाजी सुरु केली आहे. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका सलामीला येणार आहेत.
भारताचे अंतिम 11 : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, इशान किशन (यष्टीरक्षक), मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल.