India vs Sri Lanka ODI Series: टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये तीन वनडे सामन्यांच्या सीरीजमधील पहिली वनडे मॅच गुवाहाटीच्या मैदानावर खेळली जाणार आहे. श्रीलंके विरुद्धच्या वनडे सीरीजपासून टीम इंडिया वनडे वर्ल्ड कप 2023 ची तयारी सुरु करणार आहे. टीम इंडियाने दोन वेळा वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. आता तिसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांची जोडी काम सुरु करणार आहे. टीम इंडियामोर अनेक मोठी आव्हान आहेत. कॅप्टन आणि कोचला मिळून या प्रश्नांची उत्तर शोधावी लागतील. काही त्रुटी राहिल्यास, त्या वर्ल्ड कपमध्ये भारी पडू शकतात.
रोहितचा ओपनिंग पार्ट्नर कोण?
वनडे सीरीजसाठी शिखर धवनची निवड झालेली नाही. इशान किशन, केएल राहुल आणि शुभमन गिल यांचा ओपनर म्हणून टीम इंडियात समावेश केलाय. आता या तिघांपैकी रोहित शर्माचा ओपनिंग पार्टनर कोण असेल? हा प्रश्न आहे. टीम मॅनेजमेंटला यावर निर्णय घ्यावा लागेल. केएल राहुल खराब फॉर्ममध्ये आहे. मागच्या काही सामन्यात इशान किशनने धडाकेबाजी फलंदाजी करुन सर्वांचच मन जिंकलय
डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी मोठी समस्या
आशिया कप 2022 आणि टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्या. टी 20, वनडे किंवा कुठलाही फॉर्मेट असो, टीम इंडियाच्या बॉलर्सनी डेथ ओव्हर्लमध्ये भरपूर धावा दिल्या. वनडे सीरीजसाठी जसप्रीत बुमराह टीममध्ये पुनरागमन करणार आहे. त्याची साथ देण्यासाठी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज सुद्धा टीममध्ये आहेत. टीम इंडियाला धावा लुटवण्याच्या समस्येवर मार्ग काढावा लागेल.
योग्य स्पिन जोडी निवडण्याची जबाबदारी
श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजसाठी युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवला टीम इंडियात संधी मिळालीय. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा सुद्धा रांगेत आहेत. भारतीय विकेट्वर नेहमी फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. अशावेळी योग्य स्पिन बॉलर्सची जोडी टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या ट्रॉफीपर्यंत पोहोचवू शकते.
37 वर्षांपासून टीम इंडिया अजिंक्य
भारतात श्रीलंकेने टीम इंडिया विरुद्ध एकूण 51 सामने खेळलेत. यात फक्त 12 वेळा श्रीलंकेची टीम विजय मिळवू शकली आहे. 36 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. मागच्या 37 वर्षांपासून श्रीलंकेची टीम भारतात वनडे सीरीज जिंकू शकलेली नाही.