मुंबई: आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेने टीम इंडियावर विजय मिळवला. सुपर 4 राऊंडमध्ये भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. श्रीलंकेने 6 विकेट आणि 1 चेंडू राखून विजय मिळवला. भारताने विजयासाठी दिलेलं 174 धावांच लक्ष्य श्रीलंकेने शेवटच्या 20 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर पूर्ण केलं. सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला पाच विकेटने पराभूत केलं होतं.
टीम इंडियाच स्पर्धेतील आव्हान आता अन्य टीम्सच्या कामगिरीवर अवलंबून असेल. आज करो या मरो सामना होता. भारताला विजय आवश्यक होता. पण श्रीलंकन फलंदाजांनी दमदार खेळ दाखवला. कुसल मेंडीस (57) आणि पाथुम निसंका (52) विजयाचे हिरो ठरले. दोघांनी 97 धावांची सलामी दिली. हे दोघे बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा डाव थोडा अडचणीत आला होता. पण भानुका राजपक्षे नाबाद (25) आणि शनाका नाबाद (33) यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलं.
आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेने टीम इंडियावर 6 विकेट आणि 1 चेंडू राखून विजय मिळवला. भारताने विजयासाठी दिलेलं 174 धावांच लक्ष्य श्रीलंकेने शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर पूर्ण केलं.
भुवनेश्वर कुमारने 19 व्या ओव्हरमध्ये दोन वाइड चेंडू टाकले. त्याशिवाय दोन चौकार खाल्ले. एकूण 14 धावा या ओव्हरमध्ये आल्या. 6 चेंडूत विजयासाठी 7 धावांची आवश्यकता.
हार्दिक पंड्याने 18 वी ओव्हर टाकली. भानुका राजपक्षे आणि दासुन शनाकाची जोडी मैदानात आहे. या ओव्हर मध्ये एक चौकार आणि एक षटकार लगावला. श्रीलंकेची 153/4 स्थिती आहे.
17 ओव्हर्स नंतर श्रीलंकेच्या 4 बाद 141 धावा झाल्या आहेत. 18 चेंडूत 33 धावांची गरज आहे.
16 ओव्हर्स मध्ये श्रीलंकेच्या 4 बाद 132 धावा झाल्या आहेत. भानुका राजपक्षे 17 धावांवर आणि दासुन शनाका 4 धावांवर खेळतोय.
श्रीलंकेला विजयासाठी 30 चेंडूत 54 धावांची आवश्यकता आहे. 15 ओव्हर्समध्ये श्रीलंकेच्या 4 बाद 120 धावा झाल्या आहेत.
भारताला श्रीलंकेची मोठी विकेट मिळाली आहे. सेट फलंदाज कुसल मेंडीसला चहलने पायचीत केलं. त्याने 37 चेंडूत 57 धावा केल्या.
टीम इंडियाने कमबॅक करताना श्रीलंकेला तिसरा धक्का दिला आहे. धनुष्का गुणतालिका 1 रन्सवर आऊट झाला. अश्विनने त्याला राहुलकरवी झेलबाद केलं. श्रीलंकेची 14 ओव्हर्समध्ये 110/3 अशी स्थिती आहे.
13 ओव्हर्समध्ये श्रीलंकेच्या 2 बाद 105 धावा झाल्या आहेत. कुसल मेंडीस 52 आणि गुणतिलका 1 रन्सवर खेळतोय.
युजवेंद्र चहलने श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. चरिथ असलंकाला त्याने शुन्यावर बाद केलं. सूर्यकुमार यादवने हा झेल घेतला. श्रीलंकेच्या 12.2 षटकात 2 बाद 99 धावा झाल्या आहेत.
पाथुम निसंकाच्या रुपात श्रीलंकेची पहिली विकेट गेली आहे. युजवेंद्र चहलने रोहित शर्माकरवी निसंकाला 52 धावांवर झेलबाद केलं. त्याने 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. 37 चेंडूत त्याने 52 धावा केल्या.
श्रीलंकेच्या 11 ओव्हर्समध्ये बिनबाद 97 धावा झाल्या आहेत. पाथुम निसंका 52 आणि मेंडिस 45 धावांवर खेळतोय.
श्रीलंकेच्या 10 ओव्हर्समध्ये बिनबाद 89 धावा झाल्या आहेत. पाथुम निसंकाने अर्धशतक झळकावलं. तो 50 आणि मेंडिस 39 धावांवर खेळतोय.
श्रीलंकेने एकदम कडक सुरुवात केली आहे. 8 ओव्हर्समध्ये त्यांच्या बिनबाद 74 धावा झाल्या आहेत.
श्रीलंकेने चांगली सुरुवात केलीय. सहा ओव्हर्समध्ये श्रीलंकेच्या बिनबाद 57 धावा झाल्या आहेत. पाथुम निसंका 33 आणि कुसल मेंडीस 24 धावांवर खेळतोय.
श्रीलंकेने चांगली सुरुवात केलीय. पाच ओव्हर्स मध्ये श्रीलंकेच्या बिनबाद 45 धावा झाल्या आहेत. पाथुम निसंका 28 आणि कुसल मेंडीस 17 धावांवर खेळतोय.
4 ओव्हर्समध्ये श्रीलंकेच्या बिनबाद 27 धावा झाल्या आहेत. पाथुम निसंका आणि कुसल मेंडीस या सलामीवीरांची जोडी मैदानात आहे.
3 ओव्हर्समध्ये श्रीलंकेच्या बिनबाद 17 धावा झाल्या आहेत. पाथुम निसंका आणि कुसल मेंडीस या सलामीवीरांची जोडी मैदानात आहे.
रोहित शर्माच्या दमदार परफॉर्मन्सच्या बळावर भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. रोहितने सर्वाधिक 72 आणि सूर्यकुमारने 34 धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. ती महत्त्वपूर्ण ठरली.
मधुशंकाच्या गोलंदाजीवर दीपक हुड्डा पाठोपाठ ऋषभ पंत आऊट झाला. ऋषभने 17 धावांच्य खेळीत 3 चौकार लगावले. फटकेबाजी करण्याच्या नादात त्याने निसंकाकडे झेल दिला.
मधुशंकाच्या गोलंदाजीवर दीपक हुड्डा 3 धावांवर क्लीन बोल्ड झाला. भारताच्या 6 बाद 157 धावा झाल्या आहेत. 19 वी ओव्हर सुरु आहे.
हार्दिक पंड्या आऊट झाला. 13 चेंडूत त्याने 17 धावा केल्या. शनाकाच्या गोलंदाजीवर त्याने निसंकाकडे झेल दिला. दीपक हुड्डाला नो बॉलमुळे जीवदान मिळालं. 18 ओव्हर्समध्ये टीम इंडियाच्या 5 बाद 156 धावा झाल्या आहेत.
16 ओव्हर्समध्ये भारताच्या 4 बाद 135 धावा झाल्या आहेत. पंड्या 7 आणि पंत 14 धावांवर खेळतोय.
15 व्या षटकात ऋषभ पंतने दोन कडक फोर मारले. टीम इंडियाच्या 4 बाद 127 धावा झाल्या आहेत.
भारताला मोठा झटका बसला आहे. सूर्यकुमार यादव 34 धावांवर OUT झाला. शनाकाच्या गोलंदाजीवर त्याने तीक्ष्णाकडे झेल दिला. 29 चेंडूत त्याने 34 धावा केल्या. भारताच्या 4 बाद 119 धावा झाल्या आहेत.
14 ओव्हर मध्ये भारताच्या 3 बाद 118 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याची जोडी मैदानात आहे.
13 ओव्हर मध्ये भारताच्या 3 बाद 112 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याची जोडी मैदानात आहे.
दमदार फलंदाजीनंतर अखेर रोहित शर्मा करुणारत्नेच्या गोलंदाजीवर आऊट झाला. निसंकाकडे त्याने झेल दिला. रोहित शर्माने 41 चेंडूत 72 धावा चोपल्या. यात 5 चौकार आणि 4 सिक्स आहे.
वानिंन्दु हसरंगाने 12 वी ओव्हर टाकली. या षटकात रोहितने त्याची जबरदस्त धुलाई केली. भारताच्या दोन बाद 109 धावा झाल्या आहेत.
टीम इंडियाच्या 11 ओव्हर मध्ये 2 बाद 91 धावा झाल्या आहेत. रोहित 55, सूर्यकुमार 27 धावांवर खेळतोय.
भारताच्या 10 ओव्हरमध्ये 2 बाद 79 धावा झाल्या आहेत. रोहित शर्माने शानदार अर्धशतक झळकावल आहे. रोहित 53 आणि सूर्यकुमार 17 धावांवर खेळतोय.
9 ओव्हर्स मध्ये भारताच्या 2 बाद 65 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा 41 आणि सूर्यकुमार यादव 15 धावांवर खेळतोय.
पावरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये भारताच्या 2 बाद 44 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा-सूर्यकुमारची जोडी मैदानात आहे.
पाच ओव्हर्समध्ये भारताच्या 2 बाद 36 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा 23 आणि सूर्यकुमार 4 धावांवर खेळतोय.
केएल राहुल पाठोपाठ भारताला दुसरा झटका बसला आहे. विराट कोहली शुन्यावर OUT झाला. दिलशान मधुशंकाने त्याला बोल्ड केलं. 3 ओव्हर्स मध्ये भारताच्या 15/2 धावा झाल्या आहेत.
केएल राहुलच्या रुपात भारताची पहिली विकेट गेली आहे. तीक्ष्णाने राहुलला अवघ्या 6 धावांवर पायचीत पकडलं. दोन षटकात भारताच्या एक बाद 11 धावा झाल्या आहेत.
पहिल्या ओव्हर मध्ये भारताच्या बिनबाद 4 धावा झाल्या आहेत. सलमीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुलची जोडी मैदानात आहे.
दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस, पाथुम निसंका, चरित असालंका, दानुष्का गुणतिलका, भानुका राजपक्षा, चामिका करुणारत्ने, वानिंदु हसारंगा, महीष तीक्षणा, असिता फर्नांडो आणि दिलशान मधुशंका
टीम इंडियात एकमेव बदल करण्यात आला आहे. रवी बिश्नोईच्या जागी आर.अश्विनचा समावेश करण्यात आला आहे.
One change in the #TeamIndia Playing XI.
R Ashwin comes in for Ravi Bishnoi.
Live – https://t.co/JFtIjXSBXC #INDvSL #AsiaCup2022 pic.twitter.com/yxZoLWYHTe
— BCCI (@BCCI) September 6, 2022
आवेश खान मागच्या सामन्यात खेळला नव्हता. कारण तो आजारी होता. आजच्या सामन्यात आवेश खानला संधी मिळते की, नाही यावर सगळ्यांच लक्ष असेल.
या पीचवर टॉस जिंकणारी टीम प्रथम गोलंदाजी करणं पसंत करेल. टीम मध्ये अतिरिक्त स्पिनरचा समावेश करण्याचा सल्लाही रसल अरनॉल्ड यांनी दिला. ते श्रीलंकेचे माजी खेळाडू आहेत.