IND vs SL | श्रेयस अय्यरच काम, रोहित शर्माच्या बायकोला जागेवरुन उठवलं, VIDEO

| Updated on: Nov 03, 2023 | 9:22 AM

IND vs SL | गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत-श्रीलंकेमध्ये सामना झाला. या मॅचमध्ये टीम इंडियाने कमालीच प्रदर्शन केलं. समोर श्रीलंकेची टीम आहे असं वाटलच नाही. एखाद्या क्लब लेव्हलच्या टीमसारखा श्रीलंकन संघाने परफॉर्मन्स दिला. त्यामुळे टीम इंडियाने या मॅचमध्ये मोठा, दणदणीत विजय मिळवला.

IND vs SL | श्रेयस अय्यरच काम, रोहित शर्माच्या बायकोला जागेवरुन उठवलं, VIDEO
Ritika Sajdeh-Shreyas iyer
Follow us on

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर काही खास करु शकला नव्हता. पण गुरुवारी त्याने श्रीलंकेविरुद्ध जबरदस्त बॅटिंग केली. श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्ध तडाखेबंद अर्धशतक झळकवलं. त्याने हिटिंग केली. त्याने लांबलचक सिक्स मारले. अय्यरने एक सिक्स तर इतका लांब मारला की, वर्ल्ड कप 2023 मधील रेकॉर्ड तुटला. श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्ध 106 मीटर लांब सिक्स मारला. या वर्ल्ड कपमधला हा सर्वात लांब मारलेला सिक्स आहे. श्रेयस अय्यरने मारलेल्या या 106 मीटर लांबलचक सिक्समुळे रोहित शर्माची पत्नी रितिकाला धोका निर्माण झाला असता. अय्यरने 36 व्या ओव्हरमध्ये ओव्हरपीच चेंडू लॉन्ग ऑनवरुन सीमारेषेपार पोहोचवला.

हा सिक्स इतका लांबलचक होता की, चेंडू व्हीआयपी बॉक्समध्ये सीटवर बसलेल्या रितिका सजदेहपर्यंत पोहोचला. रितिकाच या सिक्सवर लक्ष होतं. वेळीच ती तिथून उठून पळाली. रितिकासोबत अश्विनची पत्नी आणि युजवेंद्र चहलची बायको धनश्री सुद्धा होते. भारत-श्रीलंका सामन्यात रितिकाच मन मोडलं. तिला आनंदी होण्याची संधी मिळाली नाही. कारण पती रोहित शर्मा फक्त 4 रन्सवर आऊट झाला. रोहितने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. पण त्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. रोहित दिलशान मधुशंकाचा स्लोअर चेंडू ओळखू शकला नाही.


फक्त एकाच गोष्टीच वाईट वाटलं

रोहितने निराश केलं पण विराट कोहली आणि शुभमन गिलने आपल्या फलंदाजीने उपस्थितांची मन जिंकली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली. फक्त एकाच गोष्टीच वाईट वाटलं. दोघांची शतकाची संधी हुकली. गिलने 92 धावांवर आपली विकेट गमावली. विराट कोहली 88 रन्सवर आऊट झाला. मीडल ओव्हर्समध्ये केएल राहुलने 21 आणि सूर्यकुमार यादवने 12 धावा केल्या. पण चौथ्या नंबरवर आलेल्या श्रेयस अय्यरने तुफान फटकेबाजी केली. टीकाकारांची तोंड अय्यरने बंद केली.