IND vs SL 1st Test: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग XI बद्दल रोहितच मौन, विराटच्या 100 व्या कसोटीवर म्हणाला….

| Updated on: Mar 03, 2022 | 2:24 PM

IND vs SL 1st Test: भारत आणि श्रीलंकेमध्ये उद्या पहिला कसोटी सामना (IND vs SL 1st Test) होत आहे. भारतासाठी हा सामना अनेक अंगांनी खास आहे.

IND vs SL 1st Test: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग XI बद्दल रोहितच मौन, विराटच्या 100 व्या कसोटीवर म्हणाला....
Image Credit source: AFP
Follow us on

IND vs SL 1st Test: भारत आणि श्रीलंकेमध्ये उद्या पहिला कसोटी सामना (IND vs SL 1st Test) होत आहे. भारतासाठी हा सामना अनेक अंगांनी खास आहे. कारण कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माचा (Rohit sharma) हा पहिलाच सामना आहे. त्याचवेळी विराट कोहलीचा हा 100 वा कसोटी सामना आहे. त्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माने आज पत्रकार परिषदेला संबोधित केलं. मोहालीमध्ये (Mohali Test) उद्यापासून कसोटी सामन्याला सुरुवात होईल. रोहित शर्मा विराट कोहलीच्या 100 व्या सामन्याबद्दल बोलला. पण त्याने उद्या कुणाला खेळवणार? कुणाला बाहेर बसवणार? या बद्दल काही भाष्य केलं नाही. मोहालीच्या खेळपट्टीचा विचार करता, तिसरा फिरकी गोलंदाज खेळवण्याचे रोहितने संकेत दिले आहेत.

खेळपट्टी कशी आहे?

मोहालीची खेळपट्टी कोरडी असून फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते असं रोहितचं मत आहे. “मोहालीमध्ये याआधी सुद्धा अशाच प्रकारची खेळपट्टी पाहिली आहे. ही खेळपट्टी थोडी कोरडी वाटते. हा टिपिकल भारतीय पीच आहे. पण निश्चित चेंडू इथे वळेल” असं रोहित शर्मा प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं.

विराट कोहलीची 100 वी कसोटी

विराट कोहलीच्या 100 व्या कसोटीबद्दल रोहित म्हणाला की, “हा एक चमकदार प्रवास होता. त्याने कसोटीमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. हा प्रवास पाहणं एक सुंदर अनुभव होता. विराटसाठी ही कसोटी विशेष बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्याच्यासाठी हे पाच दिवस चांगले राहतील अशी अपेक्षा करुया”

कर्णधार म्हणून डेब्यु करण्याच्या मुद्दावर म्हणाला…

“जास्तीत जास्त सामने जिंकण्याचा माझा प्रयत्न आहे. योग्य खेळाडूंबरोबर योग्य गोष्टी झाल्या पाहिजेत. कसोटी संघाचा विचार केल्यास आम्ही एका चांगल्या स्थानावर आहोत. त्याचं सर्व श्रेय विराटला जातं. मला फक्त इथून हे पुढे घेऊन जायचं आहे. संघ म्हणून आम्हाला सुधारणा करायची आहे आणि चूका सुधारायच्या आहेत” असे रोहित म्हणाला.

India vs Srilanka first test mohali Rohit Sharma HINTS at extra spinner but stays tight lipped on Playing XI