कांगडा – भारताने श्रीलंकेविरुद्धचा (india vs Srilanka) दुसरा टी-20 सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पण टीम इंडियासाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. भारताचा विकेटकिपर फलंदाज इशान किशनला (Ishan kishan) रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. इशान किशनला कांगडाच्या फोर्टिस रुग्णालयात (Fortis Hospital) दाखल करण्यात आलं आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरु कुमाराचा बाऊन्सर चेंडू इशान किशनच्या हेल्मेटवर आदळला होता. कुमाराने 147 KMPH वेगाने टाकलेल्या चेंडूवर इशान पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू इशान किशनच्या हेल्मेटवर येऊन आदळला. त्यानंतर इशान किशन काही वेळासाठी जमिनीवर बसला.हेल्मेटमुळे इशानला होणारी गंभीर दुखापत टळली. इशानला जोरात चेंडू लागल्याचं लक्षात येताच मदतीसाठी श्रीलंकेचे खेळाडू धावले.
मैदान सोडलं नाही
इशान थोडा वेळ खाली बसला. पण त्याने मैदान सोडलं नाही. तो पुन्हा उठून खेळण्यासाठी उभा राहिला. लहिरु कुमारा चौथं षटक टाकत असताना ही घटना घडली. इशानने या सामन्यात 15 चेंडूत 16 धावा केल्या. कुमाराने त्याला शानकाकरवी झेलबाद केलं.
Indian cricketer Ishan Kishan is under medical examination after getting hit on the head during India vs Sri Lanka 2nd T20I. Sri Lanka player Dinesh Chandimal was also taken to hospital as part of precautionary measures after an injury: Himachal Pradesh Cricket Association
— ANI (@ANI) February 26, 2022
दीनेश चंडीमलही हॉस्पिटलमध्ये
इशान किशनशिवाय श्रीलंकेच्या दीनेश चंडीमललाही मैदानावर क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्याच्या हाताला मार लागला होता. त्याला सुद्धा फोर्टिस रुग्णालयातच दाखल करण्यात आलं आहे. इशान किशनच्या डोक्याचं सीटी स्कॅन करण्यात आलं आहे. पण त्यात गंभीर दुखापत झाली नसल्याचं डॉक्टरांना आढळून आलं आहे. इशानला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. खबरदारीच पाऊल म्हणून दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
— Rishobpuant (@rishobpuant) February 26, 2022
फोर्टिस हॉस्पिटलभोवती कडेकोट सुरक्षा बंदोबस्त
दोन आंतरराष्ट्रीय खेळाडू फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने रुग्णालयाभोवती कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बीसीसीआयने या संदर्भात अधिकृतपणे कुठलीही माहिती दिलेली नाही. इशानची तब्येत आता बरी आहे. उद्या सकाळी त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली जाईल. इशान किशनने मागच्या सामन्यात 89 धावांची जबरदस्त खेळी केली होती. यावर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळवण्यासाठी इशानला आपल्या कामगिरीत सातत्य ठेवावं लागेल. IPL 2022 च्या ऑक्शनमधला इशान सर्वात महागडा खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सने तब्बल 15.25 कोटी रुपये मोजून इशानला विकत घेतलं आहे. मुंबईने सुद्धा प्रथमच एका खेळाडूसाठी ऑक्शनमध्ये इतके पैसे खर्च केले.