नवी दिल्ली: भारत आणि श्रीलंकेमध्ये (India vs Sri Lanka) आज दुसरा टी-20 सामना होणार आहे. मालिकेतील उर्वरित दोन्ही टी-20 सामने धर्मशाळामध्येच (Dharamshala) होणार आहेत. पहिला टी-20 सामना जिंकल्यानंतर चाहत्यांचे दुसऱ्या लढतीकडे डोळे लागले आहेत. पण भारत-श्रीलंका सामन्याआधी पावसाचा खेळ सुरु आहे. पाऊस भारतीय चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवू शकतो. वेदर रिपोर्ट्नुसार, (Weather Report) सामन्या दरम्यान पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. पावसामुळे सामना पाहण्याची मजाच निघून जाईल. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. भारताने पहिली लढत 62 धावांनी जिंकली आहे. धर्मशाळामध्ये मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पण पावसाने व्यत्यय आणाल नाही, तरच विजयी आघाडीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
धर्मशाळामध्ये पहिल्यांदाच खराब हवामान किंवा पावसामुळे व्यत्यय येतोय, असं नाहीय, तर याआधी सुद्धा तिथे अनेक सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. आता भारत-श्रीलंकेत दुसऱ्या टी 20 मध्येही तशीच शक्यता दिसतेय. पावसामुळे सामना झाला नाही, तर धर्मशाळामध्ये सलग रद्द झालेला हा तिसरा सामना असेल.
पावसामुळे रद्द झाले दोन सामने
याआधी सप्टेंबर 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा टी 20 सामना आणि मार्च 2020 मध्ये होणार वनडे सामना पावसामुळे रद्द झाला होता. या दोन्ही सामन्यात त्यावेळी टॉसही होऊ शकला नव्हता.
धर्मशाळामध्ये भारताचा रेकॉर्ड काय?
भारताने धर्मशाला येथे आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात 3 जिंकले आहेत आणि 3 सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे. या 6 सामन्यांपैकी एकच सामना T20 फॉरमॅटचा होता, जो भारताने 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
india vs srilanka t 20 match at dharamshala possibly rain disruption