IND vs WI 1st ODI: 2 ओव्हर्समुळे मोहम्मद सिराज बनला ‘हिरो’, जाणून घ्या कशी लिहिली भारताच्या विजयाची स्क्रिप्ट, पहा VIDEO

| Updated on: Jul 23, 2022 | 10:36 AM

IND vs WI 1st ODI: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये काल पहिला वनडे सामना (First odi) झाला. भारताने या रोमहर्षक सामन्यात अवघ्या 3 धावांनी विजय मिळवला. या मॅच मध्ये 97 धावांची खेळी करणारा शिखर धवन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

IND vs WI 1st ODI:  2 ओव्हर्समुळे मोहम्मद सिराज बनला हिरो, जाणून घ्या कशी लिहिली भारताच्या विजयाची स्क्रिप्ट, पहा VIDEO
Mohammed-siraj
Follow us on

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये काल पहिला वनडे सामना (First odi) झाला. भारताने या रोमहर्षक सामन्यात अवघ्या 3 धावांनी विजय मिळवला. या मॅच मध्ये 97 धावांची खेळी करणारा शिखर धवन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पण विजयाचा खरा हिरो मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आहे. सिराजच्या अवघ्या 2 षटकांनी सामना भारताच्या बाजूने फिरवला. त्याने 10 षटकात 57 धावा देऊन 2 विकेट काढल्या. सिराजने त्याच्या कोट्यातील शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. कॅरेबियाई फलंदाजांना त्याने चांगलच हैराण केलं. त्याच्या शानदार कामगिरीच्या बळावर शेवटच्या चेंडू पर्यंत चाललेल्या या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 3 धावांनी विजय मिळवला.

सिराजच्या यॉर्कर चेंडूंनी विंडीज फलंदाज हैराण

भारताने धवन, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांच्या बळावर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 308 धावा केल्या. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने 47 षटकात 6 बाद 271 धावा केल्या होत्या. विजयासाठी त्यांना 18 चेंडूत 38 धावांची आवश्यकता होती. पुढच्याच षटकार सिराज गोलंदाजीसाठी आला. त्याने या षटकात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर यॉर्कर चेंडूंचा मारा केला. सिराजच्या त्या षटकानंतर वेस्ट इंडिजला विजयासाठी 12 चेंडूत 27 धावांची आवश्यकता होती.

शेवटच्या षटकात सिराजने केली कमाल

49 व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने 12 धावा दिल्या. शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचू न देण्याची जबाबदारी सिराजची होती. विंडीजला लास्ट ओव्हर मध्ये 15 धावांची गरज होती. सिराजने या ओव्हर मध्ये सुद्धा यॉर्कर चेंडूंचा मारा कायम ठेवला. सिराजच्या यॉर्कर्समुळे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना मोठे फटके खेळता आले नाहीत. शेवटच्या चेंडूत विजयासाठी 5 धावांची गरज होती. म्हणजे वेस्ट इंडिजला विजयासाठी एका षटकाराची गरज होती. सिराजने शेफर्डला यॉर्कर चेंडू टाकला. त्यावर विंडीजच्या खात्यात बायच्या रुपाने एक धाव जमा झाली. अशा प्रकारने भारताने 3 रन्सनी सामना जिंकला. सिराज शिवाय शार्दुल ठाकूर आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी 2-2 विकेट घेतले.

विंडीज कडून कोणी जास्त धावा केल्या?

विंडीजच्या काइल मेयर्सने सर्वाधिक 75 धावा फटकावल्या. ब्रेंडन किगने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. अकील होसैन 32 आणि रोमारिया शेफर्ड 39 धावांवर नाबाद राहिला. भारतासाठी धवन शिवाय शुभमन गिलने 64 आणि श्रेयस अय्यरने 54 धावा केल्या.