अहमदाबाद: DRS च्या निर्णयावरुन अनेकदा मैदानात खेळाडूंमध्येच मतभिन्नता दिसून येते. कारण निर्णय चुकला, तर DRS वाया जाण्याची भिती असते. विराट कोहली कर्णधार असताना, अनेकदा त्याच्या DRS च्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जायचं. पण कर्णधारपद गेल्यानंतर विराटने (Virat kohli) आज डीआरएसच्या मदतीने भारताला एक महत्त्वाचा विकेट मिळवून दिला. 22 व्या षटकात युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) शेमारा ब्रूक्सचा विकेट काढला. पण चहलला हा विकेट मिळवून देण्यात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. कारण कॅप्टन रोहित शर्माने विराटच्या सांगण्यावरुन लगेच डीआरएस घेतला आणि भारताला विकेट मिळाला. रोहितने विराटवर विश्वास ठेवून लगेच डीआरएसचा निर्णय घेतला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बीसीसीआयने देखील आपल्या साइटवर हा व्हिडिओ अपलोड केलाय.
22 व्या षटकात युजवेंद्र चहलच्या एका लेग स्पिनवर शेमारा ब्रूक्सने फ्रंट फुटवर खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूने बॅटची कड घेतली व विकेटकिपर ऋषभ पंतच्या ग्लोव्हजमध्ये चेंडू विसावला. जोरदार अपील झालं. पण पंचांनी नॉटआऊट असल्याचं सांगितलं. बॉलने बॅटला स्पर्श केला आहे, असं युजवेंद्र चहलला वाटलं. पंतच्या मते चेंडूने बॅटची कड घेतली नव्हती. त्याचवेळी शॉर्ट कवरला उभ्या असलेल्या विराट कोहलीने चेंडू बॅटला लागला आहे, असं रोहितला सांगितलं. चेंडू बॅटला लागला. त्यानंतर पॅड आणि बॅटचा संपर्क झाल्याचं विराटच म्हणण होतं.
ICYMI – @ImRo45 : Kya hai? Out hai?@imVkohli : Mere hisaab se out hai.
? ? ?, Mic ? & a successful DRSDO NOT MISS: Stump mic gem – Virat and co. persuade Rohit to take DRS ? ?
??https://t.co/14XDnYuMrq @Paytm #INDvWI pic.twitter.com/tb4NYSx7qn
— BCCI (@BCCI) February 6, 2022
विराटच्या शब्दांमध्ये विश्वास दिसत होता. त्यामुळे रोहितने पंतच न ऐकता थेट डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. अखेर भारताला महत्त्वाचा विकेट मिळाला. अहमदाबादमध्ये कोरोनामुळे प्रेक्षकांना स्टेडियमवर प्रवेश नाहीय. त्यामुळे स्टंम्पसच्या मायक्रोफोनमधून मैदानावर होणारं सर्व बोलणं ऐकू येतं. विराटने चेंडू बॅटला लागल्याच सांगितलं, तर पंतच्या मते चेंडूने बॅटला स्पर्श केला नव्हता.
kohliiiiiiiiiiiiii pic.twitter.com/tr7j92R41A
— Aarav (@singlaaarav) February 6, 2022
भारताने आज जबरदस्त गोलंदाजी केली. वेस्ट इंडिजचा डाव 176 धावात आटोपला. भारताला विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. रोहित शर्मा आणि इशान किशनची जोडी मैदानावर आहेत.