INDvsWI 2nd ODI: समोरच्याची बोलती कशी बंद करायची, ते श्रेयस अय्यरकडून शिका, पहा VIDEO

| Updated on: Jul 25, 2022 | 12:21 PM

INDvsWI 2nd ODI: श्रेयस अय्यर (Shreyas iyer) वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या वनडेत (IND vs WI) 63 धावांची शानदार इनिंग खेळला.

INDvsWI 2nd ODI: समोरच्याची बोलती कशी बंद करायची, ते श्रेयस अय्यरकडून शिका, पहा VIDEO
shreyas-iyer
Image Credit source: AFP
Follow us on

INDvsWI 2nd ODI: श्रेयस अय्यर (Shreyas iyer) वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या वनडेत (IND vs WI) 63 धावांची शानदार इनिंग खेळला. मागच्या काही सामन्यांपासून फॉर्मशी संघर्ष करणाऱ्या श्रेयस अय्यरचं हे सलग दुसरं अर्धशतक आहे. त्याने चांगली इनिंग खेळून टीकाकारांची तोंड बंद केली. पण फिल्डिंग करताना प्रत्यक्षात समोरच्याच तोंड कसं बंद करायचं, ते सुद्धा दाखवून दिलं. त्याच्या सेलिब्रेशचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय. अय्यरने शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर रोव्हमॅन पॉवेलचा झेल घेतला व 13 धावांवर त्याला पॅव्हेलियन मध्ये पाठवलं.

अय्यरकडून तोंड बंद करण्याचा इशारा

पॉवेलने ठाकूरच्या गोलंदाजीवर कव्हर्सवरुन फटका खेळला. अय्यरने इथे संधी सोडली नाही. डीप कव्हरला एक शानदार कॅच घेतला. त्यानंतर त्याने वेगळ्याच स्टाइल मध्ये सेलिब्रेशन केलं. त्याने तोंड बंद ठेवण्याचा इशारा केला. वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या वनडेत अय्यरने ब्रुक्सची फाइन लेग बाऊंड्रीवर कॅच पकडून डान्स करुन सेलिब्रेशन केलं होतं. कॅच घेतल्यानंतर स्टँडच्या दिशेने वळून अय्यरने डान्स स्टेप्स केल्या होत्या.

कॅच सोडायला सांगत होते प्रेक्षक

अय्यरने सांगितलं की, प्रेक्षक त्याला डिवचत होते. कॅच सोडण्यासाठी त्याला सांगत होते. म्हणून कॅच घेतल्यानंतर त्यांच्यासारखा डान्स करण्याचा प्रयत्न केला, असं श्रेयस अय्यर म्हणाला. शार्दुल ठाकूरने दुसऱ्या वनडेत 3 विकेट घेतल्या. दीपक हुड्डा, अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक-एक विकेट घेतला.

पुलच्या शॉटच्या मोहात पाडलं

पहिल्या वनडेत वेस्ट इंडिजच्या डावात 24 व्या षटकात शामराह ब्रुक्स अर्धशतकाच्या जवळ होता. मेयर्सने त्याआधी अर्धशतक फटकावलं होतं. शार्दुल ठाकूरने ब्रुक्सला पुलच्या शॉटच्या मोहात पाडलं. ब्रुक्सला ठाकूरच्या गोलंदाजीवर फटका व्यवस्थित खेळता आला नाही. व्यवस्थित कनेक्शन झालं नाही. श्रेयस अय्यरने डीप स्क्वेयर लेगला त्याचा झेल घेतला. ब्रुक्सने 61 चेंडूत 46 धावा केल्या. यात चार चौकार आणि एक षटकार आहे.

मैदानावरच डान्स केला

ब्रुक्सचा झेल घेतल्यानंतर श्रेयस अय्यरने खास स्टाइलने सेलिब्रेश केलं. त्याने मैदानावरच डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.