IND vs WI, 2nd T20,: वेस्ट इंडिजला हरवलं, भारताकडे मालिकेत 2-0 विजयी आघाडी

| Updated on: Feb 18, 2022 | 11:09 PM

India vs West Indies 1st T20 Live Cricket Score and Updates in Marathi:

IND vs WI, 2nd T20,: वेस्ट इंडिजला हरवलं, भारताकडे मालिकेत 2-0 विजयी आघाडी
Follow us on

कोलकाता: शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात भारताने अखेर वेस्ट इंडिजवर (India vs West indies) आठ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने टी 20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. रोव्हमॅन पॉवेलने शेवटपर्यंत विजयासाठी प्रयत्न केले. त्याने 36 चेंडूत 68 धावा केल्या. यात चार चौकार आणि पाच षटकार लगावले. वेस्ट इंडिजने निर्धारीत 20 षटकात तीन बाद 178 धावा केल्या. हर्षल पटेल (Harshal patel) आणि भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar kumar) शेवटच्या तीन षटकात हुशारीने गोलंदाजी केली. त्यामुळे भारताला विजय मिळवता आला. निकोलस पूरन आणि रोव्हमॅन पॉवेलची जोडी मैदानावर फटकेबाजी करत होती, त्यावेळी वेस्ट इंडिज हा सामना सहज जिंकणार असे वाटत होते. पण शेवटच्या तीन षटकात खेळ बदलला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Feb 2022 10:49 PM (IST)

    रोमांचक सामना भारताने आठ धावांनी जिंकला

    शेवटपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर आठ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने टी 20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. रोव्हमॅन पॉवेलने शेवटपर्यंत विजयासाठी प्रयत्न केले. त्याने 36 चेंडूत 68 धावा केल्या. यात चार चौकार आणि पाच षटकार लगावले.

  • 18 Feb 2022 10:37 PM (IST)

    अखेर निकोलस पूरन आऊट

    स्लोवर वन चेंडूवर अखेर निकोलस पूरन आऊट. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर पूरन बिश्नोईकडून झेलबाद. 9 चेंडूत विंडिजला विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. वेस्ट इंडिज तीन बाद 160 धावा. पूरनने 62 धावा केल्या.


  • 18 Feb 2022 10:29 PM (IST)

    निकोलस पूरनने षटकार ठोकून पूर्ण केलं अर्धशतक

    निकोलस पूरनने षटकार ठोकून पूर्ण केलं अर्धशतक. 34 चेंडूत त्याने अर्धशतक झळकावलं. या खेळीत त्याने चार चौकार आणि तीन षटकार लगावले. वेस्ट इंडिजच्या 17 षटकात 150 धावा झाल्या आहेत. रोव्हमॅन पॉवेल 49 धावांवर खेळतोय.

  • 18 Feb 2022 10:16 PM (IST)

    15 षटकात वेस्ट इंडिजच्या 124 धावा

    निकोलस पूरन आणि रोव्हमॅन पॉवेल दमदार फलंदाजी करत आहेत. 15 षटकात वेस्ट इंडिजच्या 124 धावा झाल्या आहेत. पाच षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी 63 धावांची आवश्यकता आहे.

  • 18 Feb 2022 10:04 PM (IST)

    वेस्ट इंडिजने पार केला 100 धावांचा टप्पा

    वेस्ट इंडिजने 100 धावांचा टप्पा पार केला असून त्यांच्या 13 षटकात दोन बाद 103 धावा झाल्या आहेत.

  • 18 Feb 2022 10:01 PM (IST)

    पूरन-पॉवेलची दमदार फलंदाजी

    वेस्ट इंडिजच्या 12 षटकात दोन बाद 91 धावा झाल्या आहेत. निकोलस पूरन (38) आणि रोव्हमॅन पॉवेल (13) धावांवर खेळतोय. दोघे दमदार फलंदाजी करत आहेत.

  • 18 Feb 2022 09:40 PM (IST)

    वेस्ट इंडिजला दुसरा धक्का

    वेस्ट इंडिजला दुसरा धक्का. रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर ब्रँडन किंग बाद. त्याने 30 चेंडूत 22 धावा केल्या. आठ षटकात वेस्ट इंडिजच्या दोन बाद 59 धावा झाल्या आहेत.

  • 18 Feb 2022 09:21 PM (IST)

    वेस्ट इंडिजला पहिला धक्का

    भारताने वेस्ट इंडिजला पहिला धक्का दिला आहे. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर मेयर्स नऊ धावांवर बाद झाला. मेयर्सने चहलकडे सोपा झेल दिला.

  • 18 Feb 2022 09:20 PM (IST)

    वेस्ट इंडिजच्या बिनबाद 34 धावा

    वेस्ट इंडिजच्या पाच षटकात बिनबाद 34 धावा झाल्या आहेत. किंग 18 आणि मेयर्स 9 धावांवर खेळतोय.

  • 18 Feb 2022 09:04 PM (IST)

    वेस्ट इंडिजच्या डावाला सुरुवात

    वेस्ट इंडिजच्या डावाला सुरुवात झाली आहे. दोन षटकात त्यांच्या 14 धावा झाल्या आहेत. ब्रँडन किंग सात आणि मेयर्स दोन धावांवर खेळतोय

  • 18 Feb 2022 08:46 PM (IST)

    वेस्ट इंडिजला विजयासाठी 187 धावांच लक्ष्य

    ऋषभ पंत -वेंकटेश अय्यरने विंडिजच्या गोलंदाजांना धु-धु धुतलं. विराट कोहली बाद झाल्यानंतर दोघांनी सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. भारताने 20 षटकात पाच बाद 186 धावा केल्या आहेत. पंतने शानदार अर्धशतक झळकावलं. त्याने 28 चेंडूत नाबाद 52 धावांची खेळी केली. यात सात चौकार आणि एक षटकार होता. वेंकटेश अय्यरने 18 चेंडूत 33 धावा केल्या. यात चार चौकार आणि एक षटकार होता.

  • 18 Feb 2022 08:21 PM (IST)

    कॉटरेलच्या एका षटकात तीन चौकार

    शेल्डर कॉटरेलच्या एका षटकात पंत आणि अय्यरने तीन चौकार लगावले. 16 षटकात भारताच्या चार बाद 139 धावा झाल्या आहेत. पंत 31 आणि अय्यर 17 धावांवर खेळतोय.

  • 18 Feb 2022 08:16 PM (IST)

    ऋषभ पंतची दमदार फलंदाजी

    15 षटकात भारताच्या चार बाद 124 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत 26 आणि वेंकटेश अय्यर पाच धावांवर खेळतोय. कायरन पोलार्डच्या एका षटकात पंतने तीन चौकार लगावले.

  • 18 Feb 2022 08:10 PM (IST)

    विराट कोहली अर्धशतक झळकावल्यानंतर बाद

    षटकार ठोकून अर्धशतक झळकावल्यानंतर विराट कोहली बाद झाला आहे. रॉस्टन चेसने एका सुंदर चेंडूवर कोहलीला क्लीन बोल्ड केलं. भारताच्या चार बाद 106 धावा झाल्या आहेत.

  • 18 Feb 2022 08:06 PM (IST)

    भारत शतकाच्या जवळ

    तेरा षटकात भारताच्या तीन बाद 98 धावा झाल्या आहेत. विराट कोहली 46 आणि पंत 11 धावांवर खेळतोय.

  • 18 Feb 2022 08:01 PM (IST)

    भारताच्या 88 धावा

    12 षटकात भारताच्या तीन बाद 88 धावा झाल्या आहेत. विराट कोहली 39 आणि पंत 11 धावांवर खेळतोय.

  • 18 Feb 2022 07:56 PM (IST)

    कोहली-पंतची जोडी मैदानात

    भारताच्या दहा षटकात तीन बाद 76 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव बाद होणारा शेवटचा फलंदाज ठरला. आठ धावांवर रॉस्टन चेसच्या गोलंदाजीवर त्याच्याकडेच सोपा झेल दिला. विराट कोहली एकाबाजूने चांगली फलंदाजी करतोय. आता ऋषभ पंत मैदानावर आहे.

  • 18 Feb 2022 07:42 PM (IST)

    रोहित शर्मा बाद

    कर्णधार रोहित शर्मा 19 धावांवर बाद झाला. रॉस्टन चेसला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ब्रँडन किंगकरवी झेलबाद झाला. भारताच्या आठ षटकात दोन बाद 65 धावा झाल्या आहेत.

  • 18 Feb 2022 07:33 PM (IST)

    विराट कोहलीची आक्रमक फलंदाजी

    इशान किशन बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माने डाव सावरला आहे. सहा षटकात भारताच्या एक बाद 49 धावा झाल्या आहेत. विराट कोहली (27) आणि रोहित शर्मा (17) धावांवर खेळतोय. विराट कोहली आक्रमक फलंदाजी करत असून त्याने आतापर्यंत सहा चौकार लगावले आहेत.

  • 18 Feb 2022 07:18 PM (IST)

    विराटने लगावले दोन चौकार

    भारताच्या तीन षटकात एक बाद 18 धावा झाल्या आहेत. विराट कोहलीने अकिल हुसैनच्या एका षटकात दोन चौकार लगावले. विराट 8 आणि रोहित शर्मा दोन धावांवर खेळतोय.

  • 18 Feb 2022 07:14 PM (IST)

    इशान किशन आऊट

    इशान किशन व्यक्तीगत दोन धावांवर आऊट झाला. शेल्डर कॉटरेलने पहिले चार चेंडू निर्धाव टाकले, त्यानंतर किशनला मेयर्सकरवी झेलबाद केले. भारताच्या एक बाद 10 धावा झाल्या आहेत.

  • 18 Feb 2022 07:08 PM (IST)

    रोहित शर्मा-इशान किशन मैदानावर

    अकील हुसैनच्या पहिल्या षटकात भारताने बिनबाद 10 धावा केल्या आहेत. सलामीवीर रोहित शर्माने दोन आणि इशान किशन 2 धावांवर खेळत आहे.

  • 18 Feb 2022 07:02 PM (IST)

    दुसऱ्या वनडेत धक्का तंत्र

    दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजने वेगवान गोलंदाजाऐवजी अकील हुसैन या फिरकी गोलंदाजाला पहिले षटक दिले आहे.

  • 18 Feb 2022 06:55 PM (IST)

    वेस्टइंडीजची प्लेइंग इलेवन

    वेस्टइंडीजची प्लेइंग इलेवन- ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन, रॉस्टन चेज, रॉवमॅन पॉवेल, कायरन पोलार्ड, जेसन होल्डर, ओडीन स्मिथ, अकील हुसैन, रोमारियो शेफर्ड, शेल्डर कॉटरेल

  • 18 Feb 2022 06:52 PM (IST)

    भारताची प्लेइंग इलेवन

    भारताची प्लेइंग इलेवन– रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, दीपक चाहर, वेंकटेश अय्यर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवि बिश्नोई आणि युजवेंद्र चहल.

  • 18 Feb 2022 06:51 PM (IST)

    वेस्ट इंडिजचा गोलंदाजीचा निर्णय

    वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत प्रथम फलंदाजी करणार आहे.

  • 18 Feb 2022 06:19 PM (IST)

    पहिल्या विजयात रोहित शर्मा, रवी बिश्नोई चमकले

    दोन दिवसांपूर्वी झालेला पहिला टी 20 सामना भारताने जिंकला होता. सहा गडी राखून मिळवलेल्या विजयात रवी बिश्नोई आणि रोहित शर्मा चमकले होते.