IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या ODI मध्ये मयंक नाही, तर ‘हा’ खेळाडू रोहित सोबत येणार ओपनिंगला

| Updated on: Feb 05, 2022 | 4:12 PM

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (INDvsWI) उद्यापासून एकदिवसीय सामन्यांची मालिका (ODI Series) सुरु होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्या पहिला वनडे सामना खेळला जाणार आहे.

IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या ODI मध्ये मयंक नाही, तर हा खेळाडू रोहित सोबत येणार ओपनिंगला
India vs West Indies: Rohit Sharma Back As Captain, Ravi Bishnoi Earns Maiden Call Up For ODI and T20 Series
Follow us on

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (INDvsWI) उद्यापासून एकदिवसीय सामन्यांची मालिका (ODI Series) सुरु होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्या पहिला वनडे सामना खेळला जाणार आहे. वनडे सीरीजाधी शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर या तिघांना कोविडची लागण झाली. त्यामुळे उद्या होणाऱ्या पहिल्या वनडेला आणि त्यानंतरच्या उर्वरित दोन वनडे सामन्यांनाही हे खेळाडू मुकण्याची शक्यता आहे. शिखर धवनला (Shikhar dhawan) कोरोना झाल्याने आणि राहुलही पहिल्या वनडेसाठी उपलब्ध नसल्याने सलामीच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळेच मयंक अग्रवालची संघात निवड करण्यात आली. मयंकच्या बरोबरीने आक्रमक डावखुरा फलंदाज इशान किशनचीही संघात निवड झाली आहे. अनुभव लक्षात घेता रोहित शर्मा मयंक अग्रवालला पहिल्या वनडेमध्ये सलामीची संधी देईल, अशी चर्चा होती. पण रोहितने वेगळा विचार केलाय. मयंकला सलामीला येण्याची संधी मिळणार नाहीय. त्याच्याजागी इशान किशन रोहित बरोबर सलामीला येणार आहे. स्वत: रोहितने ही माहिती दिलीय.

हा एकमेव पर्याय

“सलामीसाठी इशान किशन हा एकमेव पर्याय आहे. तो सलामीला येईल. मयंक अजूनही आयसोलेशनमध्ये आहे. काही नियम आहेत. जे खेळाडू प्रवास करतात, त्यांना क्वारंटाइनमध्ये रहावे लागते. इशान सलामीला उतरेल” असे रोहितने सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

फक्त 42 चेंडूत 59 धावा ठोकल्या

इशान किशनने मागच्यावर्षी भारतासाठी वनडेमध्ये डेब्यू केला होता. श्रीलंका दौऱ्यावर पहिल्या डेब्युमध्ये त्याने फक्त 42 चेंडूत 59 धावा ठोकल्या होत्या. मागच्यावर्षी टी 20 मध्ये त्याने भारतासाठी ओपनिंग केली होती. अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने अर्धशतक झळकावलं होतं. आयपीएलमध्ये इशान रोहितसोबत मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. वनडेमध्ये अजून तो एकाही सामन्यात सलामीवीर म्हणून खेळलेला नाहीय.

केएल राहुल संघात परतल्यानंतर तो मधल्याफळीत चौथ्या किंवा पाचव्या नंबरवर फलंदाजीला येऊ शकतो. इशान किशनला सलामीवीराच्या रुपाने स्वत:च कौशल्य दाखवण्याची चांगली संधी आहे. चांगला खेळ दाखवल्यास पुढच्यावर्षी 2023 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी त्याची दावेदारी अधिक भक्कम होऊ शकते.

India vs west indies ishan kishan will open in the first odi against west indies confirms captain rohit sharma