IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवन कॅप्टन, कोण IN, कोण OUT समजून घ्या…

| Updated on: Jul 06, 2022 | 4:29 PM

IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शिखर धवनला या सीरीजसाठी कॅप्टन बनवण्यात आलं आहे.

IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवन कॅप्टन, कोण IN, कोण OUT समजून घ्या...
Follow us on

मुंबई: वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND vs WI) वनडे सीरीजसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शिखर धवनला (Shikhar Dhawan) या मालिकेसाठी कॅप्टन बनवण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने बुधवारी 6 जुलैला वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे सीरीजसाठी संघाची घोषणा केली. या सीरीजसाठी संघाच्या सीनियर आणि वेगवेगळ्या फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. कॅप्टन रोहित शर्मा, (Rohit Sharma) विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी सारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. शुभमन गिलचं वनडे संघात पुनरागमन झालं आहे.

शिखर धवन दुसऱ्यांदा कॅप्टन

डावखुरा फलंदाज शिखर धवनकडे दुसऱ्यांदा भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. याआधी मागच्यावर्षी श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा तो कॅप्टन होता. त्यावेळी वनडे आणि टी 20 सीरीजमध्ये त्याने कॅप्टनशिप भुषवली होती. रवींद्र जाडेजाला उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. तो पहिल्यांदाच ही जबाबदारी संभाळणार आहे. जाडेजाला याआधी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचं कर्णधार बनवण्यात आलं होतं. पण तिथे तो यशस्वी ठरला नाही.

संजू सॅमसन, अक्षर पटेल वनडे टीम मध्ये

संजू सॅमसन, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांना वनडे संघात स्थान मिळालय. त्याचवेळी शुभमन गिल आणि इशान किशन यांना सुद्धा संधी मिळाली आहे.

किती सामने होणार?

वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघ एकूण आठ सामने खेळणार आहे. या सीरीजसाठी पुन्हा एकदा खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार सुरु झाला होता. भारतीय संघाकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता होती.

वेस्ट इंडिज दौरा कधी सुरु होणार?

भारताचा वेस्ट इंडिज दौरा 22 जुलैपासून सुरु होणार आहे. या सीरीज मध्ये भारतीय संघ तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. 7 ऑगस्टला हा दौरा समाप्त होईल. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार या दौऱ्यासाठी टीमची घोषणा आधीच होणार होती. पण निवड समिती काही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घ्यायचा होता.

अशी आहे टीम

शिखर धवन (कॅप्टन), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह,